Double crisis in Gadchiroli district 40 to 45 houses collapsed
देश

‘या’ जिल्ह्यावर कोसळलं दुहेरी संकट; ४० ते ४५ घरांची पडझड, लाखोंचे नुकसान तर पक्ष्यांनाही गमवावे लागले जीव

गडचिरोली : कोरोनाचं संकट गडद होत असतानाच अनेक भागांना सातत्याने चक्रीवादळाचा तडाखा बसत असल्याने दुहेरी संकटात नागरिक सापडले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात मागच्या आठवड्यात काही भागात चक्रीवादळासह पावसाने धुमाकूळ घेतला आहे त्यामुळे घरांची पडझड तसेच पिकांचे नुकसान झाले होते. १ मे रोजी रात्री पुन्हा एकदा अचानक चक्रीवादळ आल्याने मुलचेरा तालुक्यातील मल्लेरा गावातील नागरिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गावात जवळपास ४० ते ४५ घरांची पडझड झाली आहे. अचानक आलेल्या चक्रीवादळाने गावकऱ्यांची एकच तारांबळ उडाली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

तर दुसरीकडे देसाईगंज तालुक्यातही चक्रीवादळ आणि गारपीट झाल्याने नुकसान झाले. जोगीसाखरा, पाथरगोटा, शंकरनगर, पळसगाव परिसरात शेतकऱ्यांच्या धान, मका, आंबे, केळी पिकाची अतोनात हानी झाली आहे. त्यामुळे प्रशासनातर्फे पंचनामे करून त्वरित नुकसानभरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त गावकाऱ्यांकडून केली जात आहे. तर मुलचेरा तालुक्यातील मल्लेरा येथे चक्रीवादळाच्या तडाख्यात अनेक पक्ष्यांनाही जीव गमवावा लागला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत