चेन्नई : चेन्नई सुपरकिंग्सटीमचे अध्यक्ष एल. सबरेतनम यांचा मृत्यू झाला आहे. दीर्घ आजारामुळे सबरेतनम यांनी रविवारी वयाच्या 80व्या वर्षी अखेरचा श्वास घेतल्याचं त्यांच्या कुटुंबियानी सांगितलं. सबरेतनम यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. चेट्टीनाड सिमेंट कॉर्पोरेशनमध्ये ते बराच काळ कार्यकारी संचालक होते. तसंच चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्येही ते संचालक होते.
सबरेतनम इंडिया सिमेंट्सचे सल्लागार आणि कोरामंडल श्यूगर्सचे संचालक आणि सीईओ या पदावरही ते कार्यरत होते. आयपीएलच्या या हंगामात चेन्नईची टीम सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत झालेल्या 5 मॅचपैकी 4 मॅचमध्ये त्यांचा विजय झाला. मागच्या मोसमात प्ले-ऑफमध्येही न पोहोचणाऱ्या चेन्नईने यंदा मात्र कामगिरीमध्ये बरीच सुधारणा केली आहे.




