चेन्नई : चेन्नई सुपरकिंग्सटीमचे अध्यक्ष एल. सबरेतनम यांचा मृत्यू झाला आहे. दीर्घ आजारामुळे सबरेतनम यांनी रविवारी वयाच्या 80व्या वर्षी अखेरचा श्वास घेतल्याचं त्यांच्या कुटुंबियानी सांगितलं. सबरेतनम यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. चेट्टीनाड सिमेंट कॉर्पोरेशनमध्ये ते बराच काळ कार्यकारी संचालक होते. तसंच चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्येही ते संचालक होते. […]

