family planning
देश

कुटुंब नियोजन करणं स्वैच्छिक; किती मुलांना जन्म द्यावा हे ठरवता येणार नाही – केंद्र सरकार

नवी दिल्ली : बळजबरीने कुटुंब नियोजन करण्याचा केंद्र सरकारने विरोध केला आहे. असं केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे कि, किती मुलांना जन्म द्यावा हे ठरवता येणार नाही. केंद्रीय आरोग्य विभागाने सर्वोच्च न्यायालयात याबाबतचं प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

देशात कुटुंब नियोजन करणं स्वैच्छिक ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे हा निर्णय दाम्पत्याकडून स्वत: घेतला जातो. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं बंधन लादलेलं नाही, असं या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलं आहे. भाजप नेते आणि वकील अश्विनी कुमार उपाध्याय यांनी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका सादर केली आहे. त्यावर केंद्राने हे मत व्यक्त केलं आहे.

देशातील वाढत्या लोकसंख्येला नियंत्रणात आणण्यासाठी दोन मुलं असण्यासह महत्त्वाची पावलं उचलण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत