स्मार्टफोन मेकर कंपनी टेक्नोने भारतात आपला नवीन स्मार्टफोन Tecno Camon 16 लाँच केला आहे. यात क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला आहे. तसेच या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि पंच होल डिस्प्ले दिला आहे
टेक्नोच्या Tecno Camon 16 स्मार्टफोनची किंमित १० हजार ९९९ रुपये आहे. स्मार्टफोन एकाच व्हेरियंटमध्ये येतो. ज्यात ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज मिळतो. स्मार्टफोन क्लाउड व्हाइट आणि प्यूरिस्ट ब्लू या दोन कलरमध्ये उपलब्ध आहे. या फोनची विक्री १६ ऑक्टोबर पासून फ्लिपकार्टवरून बिग बिलियन डेज सेलमध्ये होणार आहे.
Tecno Camon 16 स्पेसिफिकेशन्स :
- या स्मार्टफोनमध्ये ६.८ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे.
- फोनमध्ये ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटरनल स्टोरेज सोबत मीडियाटेक हीलियो जी ७९ प्रोसेसर दिला आहे.
- फोन अँड्रॉयड १० आधारित HiOS 7.0 ऑपरेटिंग सिस्टम वर काम करतो.
- फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. रियर कॅमेऱ्यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर, २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि ए एआय लेन्स मिळतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
- फोनला पॉवर देण्यासाठी यात 5,000mAh बॅटरी दिली आहे.
- या स्मार्टफोनमध्ये व्हिडिओ सेलर रिंगटोन, स्मार्ट स्कॅनर, ऑटो इअर पिकअप, गेस्चर फ्लॅशलाइट आणि फोटो कम्प्रेसर सारखी वैशिष्ट्ये आहेत.




