Musa Yamak Undefeated German Boxer Dies Of Heart Attack During Fight Aged 38
क्रीडा

जर्मन बॉक्सर मुसा यामाक यांचे निधन, फाईट सुरु असताना आला हृदयविकाराचा झटका आणि…

म्युनिच : जर्मन बॉक्सर मुसा यामाक यांचा शनिवारी म्युनिचमध्ये युगांडाच्या हमजा वांडेराशी सामना करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ते ३८ वर्षांचे होते. बॉक्सिंग जगताने आणखी एक स्टार गमावल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. या बातमीची पुष्टी करण्यासाठी तुर्कीच्या एका अधिकाऱ्याने ट्विटरवर माहिती दिली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

“आम्ही आमचा देशबांधव मुसा अस्कान यामाक, अलुक्राचा बॉक्सर, ज्याने युरोपियन आणि आशियाई चॅम्पियनशिप जिंकली, हृदयविकाराच्या झटक्याने तरुण वयात गमावले,” असे तुर्की अधिकारी हसन तुरान यांनी ट्विटरवर सांगितले.

दुसऱ्या फेरीत यामाक यांना वांदेरा सोबतच्या लढतीत जोरदार झटका बसताना दिसला, ज्यानंतर बॉक्सरने तिसर्‍या फेरीत परत लढण्याचा प्रयत्न केला परंतु फेरी सुरू होण्यापूर्वीच तो कोसळला. यामाक यांना तत्काळ वैद्यकीय मदत मिळाली पण त्यांना वाचवता आले नाही. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

38 वर्षीय मुसा यामाक 2017 मध्ये या प्रोफेशनमध्ये आले आणि 2021 मध्ये WBFed आंतरराष्ट्रीय विजेतेपद जिंकल्यानंतर ते प्रसिद्ध झाले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत