Aditya Thackeray Convoy Car Accident
महाराष्ट्र रत्नागिरी

आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात

रत्नागिरी : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला असल्याची माहिती मिळाली आहे. ते आज रत्नागिरी दौऱ्यावर असून रत्नागिरीतील खारेपाटण याठिकाणी त्यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला आहे. सुमारे 11.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामध्ये दोन गाड्यांचं मोठं नुकसान झालं असून आदित्य ठाकरे सुखरूप असल्याची माहिती आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कणकवलीतील खारेपाटण चेकपोस्ट येथे आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यात पोलिस कार, ऍम्ब्युलन्स आणि खाजगी कार होत्या, त्यांच्यापैकी एका कारचा अचानक ब्रेक लावल्यामुळे मागील गाडी त्या गाडीला धडकली आणि हा अपघात झाला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत