Eknath Shinde receives bomb threat email, Mumbai Police on high alert for investigation.
महाराष्ट्र मुंबई राजकारण

मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांना बॉम्बने उडवण्याची धमकी, मुंबई पोलिसांना ई-मेल, यंत्रणा अलर्ट मोडवर

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवेमारण्याची धमकी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ई-मेल पोलिसांना आला असून, पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. गोरेगाव पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीकडून अशा धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला आहे. सध्या पोलिस या अज्ञात व्यक्तीचा शोध लावण्याचा प्रयत्न करत आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

गोरेगाव पोलीस स्टेशन, जेजे मार्ग पोलीस स्टेशन आणि मंत्रालयात देखील हे ई-मेल आले आहेत. यामुळे सुरक्षा यंत्रणा सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडवून टाकू, अशी धमकी या मेलमध्ये देण्यात आली आहे. सध्या तरी हे खोडसाळपणा असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. उपमुख्यमंत्र्यांसंबंधी असलेला हा ई-मेल असल्यामुळे पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. हा ई-मेल कुठून आला आणि कोणी पाठवला याचा शोध पोलिस घेत आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्लीत आहेत. आज दिल्लीतील नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या शपथविधी सोहळ्यात ते उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दिल्लीत पोहोचले होते. शपथविधीनंतर एकनाथ शिंदे मुंबईला परत येणार आहेत. त्यांना आलेल्या धमकीच्या ई-मेलमुळे सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.

राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना थेट अशी धमकी देणारा मेल प्राप्त होणे अत्यंत धक्कादायक आहे. याची गांभीर्य पाहता पोलिस यंत्रणा तपासात कार्यरत आहे. पोलिस या अज्ञात व्यक्तीपर्यंत कसे पोहोचतात आणि त्या दृष्टीने ते कोणते पाऊल उचलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. राज्याच्या एक महत्त्वाच्या नेत्याला जीव घेण्याची धमकी मिळणे अत्यंत गंभीर बाब आहे. यापूर्वीही शिंदे यांना जीवेमारण्याची धमकी मिळालेली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा आता कोणते निर्णय घेईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत