Chandrakant Patil
महाराष्ट्र

नागपूर विद्यापीठातील बनावट पदवीप्रकरणी सखोल चौकशी करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बनावट पदव्या तयार करून 27 विद्यार्थ्यांनी इराकमध्ये नोकरी मिळवल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत सांगितले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाच्या बनावट पदव्या तयार करून 27 विद्यार्थ्यांनी इराकमध्ये नोकरी मिळवल्याबाबतचा प्रश्न सदस्य मोहन मते उपस्थित केला होता.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील म्हणाले की, इराक दूतावासामार्फत 27 विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता तपासण्याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाला पत्र प्राप्त झाले होते. त्यानुसार इराक दूतावासातील अधिकाऱ्यांनी विद्यापीठाला प्रत्यक्ष भेट देऊन 27 विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रमाणपत्र तपासण्याकरीता सादर केले होते. विद्यापीठात या विद्यार्थ्यांची नोंद नसल्याचे अभिलेख्याच्या तपासणीवरून आढळून आल्याने विद्यापीठात सादर करण्यात आलेली प्रमाणपत्रे विद्यापीठाची नाहीत, असे इराक दूतावासाला पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

हे विद्यार्थी इराकचे असल्याने त्यांची चौकशी इराक दूतावासामार्फत करण्यात येईल, असे इराक दूतावासातील अधिकाऱ्यांनी विद्यापीठास कळविले आहे.

तसेच या प्रकरणाची माहिती विद्यापीठाकडून अंबाझरी पोलीस ठाणे, नागपूर, सचिव शिक्षा मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली, सचिव, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली आणि अध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांना देण्यात आली आहे, असेही मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले. या चर्चेत सदस्य अनिल देशमुख, नितीन राऊत, विकास ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, रवींद्र वायकर, ॲड. आशिष शेलार यांनी सहभाग घेतला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत