The winter session of the state legislature
महाराष्ट्र

जलजीवन मिशन कार्यक्रमाला गती देण्यासाठी 1313 नवीन पदे निर्माण करणार

नागपूर : राज्यामध्ये सुरु असलेल्या जलजीवन मिशन कार्यक्रमाला अधिक गतिमान करण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागात सुमारे १ हजार ३१३ नवीन पदे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत निर्माण करण्यात येत असल्याची घोषणा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानपरिषदेत केली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

निवेदनात मंत्री पाटील म्हणाले, “यापूर्वी उप अभियंता संवर्गातील २०७ पदांपैकी १८२ पदांची व कनिष्ठ अभियंता संवर्गातील १ हजार १७२ पदांपैकी १ हजार ९४ पदांची वाढ करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामध्ये दोन-तीन तालुक्यांकरिता एक उप अभियंता कार्यालय होते. आता प्रत्येक तालुक्याला उप अभियंता कार्यालय देणार आहे. १७३ ऐवजी १८३ उप अभियंता कार्यालय होणार आहे. जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा विभाग अधिक मजबूत होणार असून जलजीवन मिशन कार्यक्रमाला गती मिळणार आहे”, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत