Professor sentenced to five years rigorous imprisonment for sending offensive video
महाराष्ट्र

प्राध्यापिकेला पाठवली अश्लील व्हिडीओची लिंक, आरोपी प्राध्यापकाला पाच वर्ष सश्रम कारावास

बीड : एका प्राध्यापकाने सहकारी प्राध्यापिकेला अश्लील व्हिडीओची लिंक पाठवून तिचा विनयभंग केला होता. विशेष आतिरिक्त न्यायालयाने याप्रकरणी आरोपी प्राध्यापकाला पाच वर्ष सश्रम कारावास आणि आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. बीड जिल्ह्यात नोव्हेंबर 2017 मध्ये हा प्रकार घडला होता.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

शिक्षा सुनावलेला आरोपी गजानन करपे हा बीड शहरातील एका शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरीला होता. याच महाविद्यालयातील प्राध्यापिकेला त्याने व्हॉट्सअॅपवरुन अश्लील व्हिडिओ असलेली लिंक पाठवली होती. पीडित प्राध्यापिका ही स्वतः विशाखा समितीच्या अध्यक्षपदी होती. तिने तात्काळ हा प्रकार महाविद्यालय प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर या प्रकारावरुन महाविद्यालय प्रशासनाने करपे याला निलंबित केलं होतं.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत