मुंबई : हवामान विभागाकडून पुणे, सातारा आणि रत्नागिरीत आज (17 जून) रेड अलर्ट देण्यात आला आहे. ठाण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे शहरात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र, पुणे आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन तासात मुंबई आणि उपनगरांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. […]
टॅग: पुणे
पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी सापडलेले ‘ते’ मृतदेह आई आणि मुलाचे, पण…
पुणे : सासवडमध्ये काल (15 जून) सकाळी एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर रात्री एका सहा ते आठ वर्षाच्या मुलाचा मृतदेह कात्रज बोगद्याजवळ आढळून आला. हे दोन मृतदेह आई आणि मुलाचे असल्याचे उघड झाले आहे. मृत महिलेचे नाव आलिया शेख असून तिच्या मुलाचे नाव अयान शेख आहे. परंतु, आलिया यांचे पती आबीद शेख […]
हवामान खात्याकडून राज्यात ऑरेंज अलर्ट जारी, आज अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा
मुंबई : मुंबईत मान्सून दाखल झाला असून आठवडाभरापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज पावसाने विश्रांती घेतली असली तरी ढगाळ वातावरण कायम आहे. हवामान खात्याने राज्यात ४८ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आज मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापुर, सातारा व घाटमाथ्यासह संपूर्ण महाराष्ट्र ऑरेंज […]
Pune : दारूच्या नशेत मुलाने केली वडिलांची हत्या, बहिणीला दिली धमकी, आणि…
पुणे : दारूच्या आहारी गेलेल्या मुलाने आपल्या आजारी वडिलांचा गळा चिरून त्यांची हत्या केली. त्यानंतर आरोपीने वडिलांचा मृतदेह कपड्यात गुंडाळून 36 तास घरात लपवून ठेवला. पुण्याच्या उरली कांचन भागातील टीपू वस्ती येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीचा आपल्या वडिलांशी दारू पिण्यावरून वाद झाला होता, त्यानंतर त्याने वडिलांची हत्या केली. नईम रहीम शेख (वय 35) […]
पुणेकरांना मोठा दिलासा! कोरोना निर्बंध आणखी शिथिल, जाणून घ्या…
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना मोठा दिलासा दिला आहे. सोमवारपासून (14 जून) पुण्यातील मॉल्स उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर सर्व दुकाने रात्री सात वाजेपर्यंत खुली राहतील. सोमवारपासून अभ्यासिका, वाचनालय सुरु करण्यास देखील परवानगी देण्यात आली आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील कौन्सिल हॉल इथे कोरोना आढावा बैठक पार […]
ब्रेकिंग : पुण्यात अग्नितांडव, पिरंगुट एमआयडीसी भागातील सॅनिटायझर उत्पादक कारखान्यात भीषण आग, 8 महिला ठार
पुणे : पुण्याच्या पिरंगुट एमआयडीसी भागातील एका सॅनिटायझर उत्पादक कारखान्यात सायंकाळी पाचच्या सुमारास भीषण आग लागली. कारखान्यात अडकलेल्या 37 पैकी 8 महिला कामगार या भीषण आगीत मरण पावल्या आहेत. अद्याप बरेच कर्मचारी बेपत्ता आहेत. कारखान्यातून निघणारे धुराचे लॉट आजूबाजूच्या परिसरात पसरत आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मदत व […]
चोरट्यांनी बालेवाडीतील कन्स्ट्रक्शन साईटच्या लेबर कॅम्पमध्ये पाच घरे फोडली
पुणे : बालेवाडी येथील किवेस्ट कन्स्ट्रक्शन साईटच्या लेबर कॅम्प येथील पाच खोल्यांमध्ये घरफोडी करून ३६ हजार रुपये चोरल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चतुःश्रुगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मोहम्मद आलाम (वय २५) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडी येथे किवेस्ट […]
मोठी बातमी! आर्थिक अनियमिततेमुळे ‘या’ बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँकेकडून रद्द..
पुणे : आर्थिक अनियमिततेसह अन्य कारणांवरून पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) तत्काळ रद्द केला आहे. बँकेच्या ९८ टक्के ठेवीदारांच्या ठेवी पाच लाखापर्यंतच्या असल्याने त्यांना ठेव विमा महामंडळाकडून त्यांच्या ठेवी परत मिळू शकतील. सहकार विभागाने केलेल्या शिफारसीनुसार ही कारवाई केल्याचं रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलं आहे. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल तसंच […]
पुण्यातील लॉकडाऊनच्या नियमांमध्ये मोठे बदल, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची मोठी घोषणा
पुणे : पुण्यातील लॉकडाऊनच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. राजेश टोपे यांनी सांगितलं कि, “राज्यात फक्त पुण्यामध्ये दर शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्यात येते. पुण्यामध्ये पॉझिटिव्हीटीचे प्रमाण कमी होत असल्याने शनिवार आणि […]
पुण्यात तरुणावर दिवसाढवळ्या चाकूहल्ला, कारण…
पुणे : बहिणीला ‘प्रपोज’ करणाऱ्या तरुणाला तिच्या भावाने समजावून सांगितले, मात्र, त्यामुळे राग आल्याने त्या तरुणाने तरुणीच्या भावावर चाकूने वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोंढवा पोलिस ठाण्यापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर दिवसाढवळ्या ही घटना घडली आहे. हा प्रकार कोंढवा खुर्द येथील शितल पेट्रोल पंप चौकात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीच्या बहिणीला सात ते […]










