मुंबई : विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. मात्र या अधिवेशनावर देखील कोरोनाचं सावट दिसत आहे. विधानभवनात अधिवेशन सुरु होण्याआधीच 25 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती मिळत आहे. अधिवेशनाच्या दोन दिवस अगोदर विधानभवन येथे एकूण 3200 जणांच्या कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यातील 25 जण कोरोना बाधित असल्याची माहिती आहे. नाना पटोले यांनी […]
टॅग: कोरोना
1 मार्चपासून परिस्थितीनुसार गरज भासल्यास काही काळ शाळा बंद ठेवाव्यात, शिक्षण विभागाचे निर्देश
कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. बऱ्याच ठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात असलेल्या परिस्थितीनुसार स्थानिक प्रशासनाने 1 मार्चपासून आवश्यकता भासल्यास काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, असे निर्देश शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे. विद्यार्थी व शिक्षक यांची सुरक्षितता याला सर्वोच्च […]
समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण
समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण झाली आहे. उपचारासाठी त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रकाश आमटे यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी, असं त्यांचे पुत्र अनिकेत आमटे यांनी म्हटलं आहे. डॉ. प्रकाश आमटे यांना गेल्या ७ दिवसांपासून ताप आणि खोकला येत होता. त्यानंतर त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्यांची RTPCR चाचणी […]
भयंकर : वाशिम येथील वसतिगृहातील 229 विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
वाशिम : रिसोड तालुक्यातील देगावच्या एका आदिवासी वसतिगृहातील 229 विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हॉस्टेलमध्ये एकूण 327 विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांना कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी दोन दिवसांमध्ये चार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि २२९ विद्यार्थी बाधित आढळून आले आहेत. त्यानंतर हा परिसर कंटेनमेंट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. […]
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ तारखेपासून सुरु होणार मोफत कोरोना लसीकरण, जाणून घ्या कोणाला मिळणार
केंद्र सरकारने बुधवारी कोरोना लसीकरणावर मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने म्हटले आहे की 45 वर्षांपेक्षा जास्त व 60 वर्षांवरील आजारी लोकांना सरकारी केंद्रांवर मोफत लसीकरण दिले जाईल. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की 1 मार्चपासून 10 हजार सरकारी आणि 20 हजार खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू होईल. जावडेकर म्हणाले की, सरकारी केंद्रांच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी […]
कोरोनाने वाढवली चिंता, पंतप्रधानांनी बोलावली तातडीची बैठक, ‘या’ राज्यांमध्ये परिस्थिती गंभीर
देशात कोरोना संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढत आहे. त्यातच कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने देखील चिंतेत भर पडली आहे. या नव्या स्ट्रेनमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयात तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. कोरोना व्हायरसमध्ये म्युटेशन होत असते, त्यातून नव्या स्ट्रेनची निर्मिती होते. काही राज्यांमध्ये कोरोना रुग्ण संख्या वाढली असून काही […]
भयंकर : पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, आरोग्य प्रशासन देखील धास्तावले
पुणे : पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. पुण्यात आज (23 फेब्रुवारी) दुपारपर्यंतच तब्बल 650 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामध्ये संध्याकाळपर्यंत आणखी काही रुग्णांची भर पडण्याची शक्यता आहे. रुग्णवाढीचे हे प्रमाण दुप्पट आहे. काल (सोमवार) 328 नवे कोरोना रुग्ण आढळले होते. तर आज कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याने […]
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याबद्दलची माहिती दिली. ते ट्विट करत म्हणाले कि, “माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही.” तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व […]
भयंकर : महाराष्ट्र कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या उंबरठ्यावर
महाराष्ट्रात एका आठवड्यापासून कोरोनाचे नवीन रुग्ण आढळण्याच्या गतीमध्ये 200% वाढ झाली आहे. याच कारणामुळे 7 दिवसांपासून कोरोना सक्रिय प्रकरणांची संख्या सातत्याने वाढत आहे. या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे की महाराष्ट्र राज्य कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या उंबरठ्यावर उभे आहे. जर ही परिस्थिती वेळेत नियंत्रणात आणली नाही, तर परिस्थिती आणखी बिघडू शकते. गुरुवारी राज्यात विक्रमी 5,427 नवीन रुग्ण […]
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण
मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राजेश टोपे यांनीच ट्वीटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. आपली प्रकृती चांगली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. राजेश टोपे यांनी ट्विट करत म्हटले कि, ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी […]










