Social worker Dr. Prakash Amte infected with corona

समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण

नागपूर महाराष्ट्र

समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण झाली आहे. उपचारासाठी त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रकाश आमटे यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी, असं त्यांचे पुत्र अनिकेत आमटे यांनी म्हटलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

डॉ. प्रकाश आमटे यांना गेल्या ७ दिवसांपासून ताप आणि खोकला येत होता. त्यानंतर त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्यांची RTPCR चाचणी निगेटिव्ह आली. परंतु त्यांचा ताप आणि खोकला औषध घेऊनसुद्धा कमी होत नव्हता. त्यानंतर चंद्रपूरमध्ये त्यांची आज पुन्हा तपासणी करण्यात आली. तेथे सीटी स्कॅन आणि इतर ब्लड टेस्ट केल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती अनिकेत आमटे यांनी दिली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत