राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ते 14 दिवस घरात क्वारंटाइन राहणार आहेत. त्यामुळे ईडीला चौकशीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. खडसे यांना भोसरी जमीन खरेदी प्रकरणी ईडीची नोटीस मिळाली आहे. चौकशीकरिता ईडी कार्यालयात हजर राहण्यासाठी खडसे मुंबइे येथे गेलेही होते. मात्र, त्यांना सर्दी, खोकला, ताप […]
टॅग: एकनाथ खडसे
एकनाथ खडसे यांना पुन्हा कोरोनाची लागण..?
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा करोनाची बाधा झाली आहे का? असा प्रश्न त्यांनी केलेल्या ट्विट नंतर उपस्थित झाला आहे. एकनाथ खडसेंना ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी आज आपण ईडी कार्यालयात हजर राहणार, असं सांगितलं होतं. पण आता आपण १४ दिवस विश्रांती घेऊन त्यानंतर ईडी कार्यालयात जाणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं आहे. आपल्याला […]
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ED ची नोटीस, स्वतः केला खुलासा
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपल्याला अंमलबजावणी संचनालयानं (ED) नोटीस पाठवल्याचा खुलासा खुलासा केला आहे. ED ची नोटीस मिळाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरातून मला जे फोन येत आहेत. त्यातून मोठी सहानुभूती व्यक्त केली जात आहे. लोकांना असं वाटत आहे की सतत चौकशी करणं हा एक प्रकारचा माझावर अन्याय होत आहे, अशी प्रतिक्रिया देखील एकनाथ खडसे यांनी […]
एकनाथ खडसेंच्या उपस्थितीत भाजपच्या २०० हून अधिक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
जळगाव : एकनाथ खडसे भाजप सोडून राष्ट्रवादीत गेल्यानंतर भाजपचे संकट मोचन म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांच्या मतदार संघातच खडसेंनी फूट पाडली आहे. जामनेरयेथील २०० हून अधिक कार्यकर्ते आणि पदधिकाऱ्यांनी भाजपसोडून राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिल्यापासून जळगावातील भाजपचे कार्यकर्ते आणि पदधिकारी यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. आज २०० […]
खासदार सुजय विखे यांची खडसेंच्या पक्षांतराबद्दलची प्रतिकिया..
अहमदनगर : खासदार सुजय विखे यांना खडसेंच्या पक्षांतराबद्दल विचारलं असता ते म्हटले , एकनाथ खडसे हे ज्येष्ठ नेते होते. मी भाजपमध्ये नव्हतो, त्या आधीपासून ते पक्षात होते. ते गेल्यामुळे पक्षाला निश्चितच नुकसान होणार आहे. पण तो वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. मी पक्षात नवीन आहे. मला एकच वर्ष झाले. त्यामुळे एक वर्ष पक्षात असणारा व्यक्ती ४० […]
भाजपला राजीनामा दिल्यानंतर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया
मुंबई : भाजपला राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली असून पुन्हा एकदा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. आपण कोणवारही नाही फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याचं ते म्हणाले आहेत. एकनाथ खडसे म्हटले , कोणीही माझ्या राजीनाम्याची चौकशीची मागणी केली नसताना राजीनामा घेतला गेला. सभागृहात कोणी […]
एकनाथ खडसेंनी भाजपा सोडू नये अशी इच्छा – सुधीर मुनगंटीवार
मुंबई : भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी खडसेंनी भाजपा सोडू नये अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी “ओ जानेवाले, हो सके तो लौट के आना” अशा शब्दात त्यांना भावनात्मक साद घातली. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार […]
मोठी बातमी: भाजपला मोठा धक्का एकनाथ खडसेंनी भाजप सोडला, राष्ट्रवादीत प्रवेश करणार: जयंत पाटील
मुंबई : भारतीय जनता पक्षाला आज (बुधवार) एक मोठा धक्का बसला आहे. कारण की, त्यांचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला रामराम ठोकला असून ते शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन दिली. जयंत पाटील म्हणाले की, “एकनाथ खडसे यांनी भाजप पक्ष सोडला असल्याची माहिती मला […]







