राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ते 14 दिवस घरात क्वारंटाइन राहणार आहेत. त्यामुळे ईडीला चौकशीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
खडसे यांना भोसरी जमीन खरेदी प्रकरणी ईडीची नोटीस मिळाली आहे. चौकशीकरिता ईडी कार्यालयात हजर राहण्यासाठी खडसे मुंबइे येथे गेलेही होते. मात्र, त्यांना सर्दी, खोकला, ताप याचा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांनी कोरोनाची तपासणी करून घेतली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत खडसे यांना ई मेलद्वारे अहवाल पाठविण्यात आला आहे. ते 14 दिवस घरीच विलगीकरण कक्षात राहणार आहेत.
खडसे यांनी या अगोदरच ईडी कार्यालयास आपल्याला कोरोनासदृश लक्षणे असल्याचे कळविले होते. ईडीने त्यांना 14 दिवसांनी चौकशीकरीता हजर राहण्यासाठी मुदत वाढवून दिली आहे.