मुंबई : दक्षिण मुंबईतील ग्रँट रोड पूर्व परिसरात मलबार हिल पोलिसांनी मोठी कारवाई करत देह व्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत आठ आरोपींना अटक करण्यात आली असून, बळजबरीने यात ढकलण्यात आलेल्या दहा महिलांची सुटका करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साईधाम मंदिराजवळ हे रॅकेट बळजबरीने चालवले जात होते. आरोपी या महिलांना वैयक्तिक फायद्यासाठी देह व्यापारात […]
टॅग: Mumbai news
कांदिवलीतील सरोवा कॉम्प्लेक्स इमारतीत आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
मुंबई : कांदिवली पूर्वेतील ठाकूर व्हिलेजमधील सरोवा कॉम्प्लेक्स या उंच इमारतीत गुरुवारी सकाळी अचानक आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, ही आग विद्युत स्पार्किंगमुळे लागल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, समता नगर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी तातडीने कारवाई सुरू केली. आग लागल्याने काही काळ परिसरात भीतीचं वातावरण निर्माण […]
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर चार वाहनांचा विचित्र अपघात, दोन जण गंभीरपणे जखमी
मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पनवेलजवळ मंगळवारी एक मोठा अपघात घडला, ज्यात अनेक वाहनांची विचित्र टक्कर झाली. यात दोन जण जखमी झाले. हा अपघात खांदेश्वर पोलिस स्टेशनच्या हद्दीत मुंबईकडे जाणाऱ्या लेनमध्ये घडला. मिळालेल्या माहितीनुसार, एक कंटेनर ट्रकमध्ये बिघाड झाल्याने तो रस्त्यावर उभा होता. ट्रकचे इंजिन बंद पडल्यामुळे, दोन मेकॅनिक त्याची दुरुस्ती करण्यासाठी त्या ट्रकच्या जवळ उभे […]
पार्ले-जी कंपनीच्या कार्यालयांवर आयकर विभागाची छापेमारी
मुंबई : देशातला मोठा बिस्कीट ब्रँड पार्ले-जी कंपनीच्या कार्यालयांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. मुंबई आणि गुजरात राज्यातील काही कार्यालयांवर सकाळपासूनच छापेमारी सुरु झाली आहे. करचोरी प्रकरणामध्ये ही कारवाई सुरु आहे. आयकर विभागाने आज पार्ले प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, ज्याचे मुख्यालय मुंबईतील विले पार्ले येथे आहे आणि गुजरातच्या कच्छ येथील कंपनीच्या काही कारखान्यांवर अचानक छापे टाकले […]
मुंबईत हिट अँड रनची हृदयद्रावक घटना; मद्यधुंद चालकाने महिला आणि तिच्या चिमुकल्यावर गाडी चढवली
मुंबई : मुंबईतील वडाळा परिसरात रविवारी रात्री एक हिट अँड रनची घटना घडली. मद्यधुंद अवस्थेतील एका कारचालकाने घराबाहेर झोपलेल्या महिला आणि तिच्या तीन वर्षांच्या मुलावर गाडी चढवली. या अपघातात लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर महिला गंभीर जखमी होऊन रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. घटना वडाळा येथील राम मंदिर, बाळाराम खेडेकर मार्गावर मध्यरात्री घडली. प्रत्यक्षदर्शींनुसार, […]
घाटकोपरमध्ये मध्यरात्री जलवाहिनी फुटली; पाण्याचा लोंढा वस्तीत शिरला, क्षणार्धात होत्याचे नव्हते
मुंबई : शुक्रवारी रात्रीच्या सुमारास लोक घरात झोपलेले असताना अचानक ७२ इंचाची पाण्याची पाईपलाईन फुटली. या जलवाहिनीतून पाणी इतक्या वेगाने बाहेर आले की अनेक घरे, परिसर आणि रस्ते पाण्याखाली गेले. अचानक घरात आलेल्या पाण्यामुळे लोक घाबरले, गोंधळ उडाला. या पाण्याचा दाब इतका जोरदार होता, की ते सुमारे १० फुटांपर्यंत उसळत होते. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास […]
मोठी बातमी! महावितरणाकडून सर्वसामान्यांना मोठा झटका, ग्राहकांचे महिन्याचे बिल २०० रुपयांनी महागणार
मुंबईः कोळसाटंचाई, त्यामुळे आयात करावा लागणारा कोळसा, त्यातून वाढलेला वीजनिर्मिती खर्च, बाहेरून खरेदी करावी लागलेली वीज, क्रॉस सबसिडीच्या रूपात मिळालेले कमी अनुदान अशा कारणांमुळे ‘महावितरण’चा वीज खरेदी खर्च खूप वाढला आहे अशा विविध कारणांमुळे महागलेल्या वीज खरेदीपोटी ‘महावितरण’ला किमान ४० हजार कोटी रुपयांच्या वसुलीची गरज असून, त्यामुळे राज्यात वीज दरवाढ अटळ आहे. ही वाढ किमान […]
मोठी बातमी! मराठा क्रांती मोर्चा समन्वयक रमेश केरेंचा आत्महत्येचा प्रयत्न, VIDEO
मुंबई : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. विष प्राशन करून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. फेसबुक लाईव्ह सुरू असताना त्यांनी विष प्राशन केले. सध्या त्यांच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मराठा क्रांती मोर्चाबाबतची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ज्यामध्ये केरे यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप होता. ही ऑडिओ क्लिप व्हायरल […]
अभिनेत्री सायरा बानो रुग्णालयात दाखल, आयसीयूमध्ये उपचार सुरु
मुंबई : अभिनेत्री सायरा बानो यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना ब्लड प्रेशर, हाय शुगर लेव्हल आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीन दिवसांपूर्वीच सायरा बानो यांना मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्या गेल्या 3 दिवसांपासून आयसीयूमध्ये दाखल आहेत. दिलीप कुमार यांच्या मृत्यूच्या दुःखातून त्या अजूनही सावरू […]
लोकल प्रवासासाठी 1 लाख 21 हजार नागरिकांनी काढले पास, रेल्वेकडून लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ
मुंबई : 15 ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेऊन 14 दिवस पूर्ण केलेल्या प्रवाशांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारपासून स्टेशनवर प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेता मध्य आणि पश्चिम रेल्वेने लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. 11 ऑगस्टपासून एक लाख वीस हजार पेक्षा जास्त नागरिकांनी पास काढल्याची आकडेवारी रेल्वेकडून देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी […]










