मुंबई : शुक्रवारी रात्रीच्या सुमारास लोक घरात झोपलेले असताना अचानक ७२ इंचाची पाण्याची पाईपलाईन फुटली. या जलवाहिनीतून पाणी इतक्या वेगाने बाहेर आले की अनेक घरे, परिसर आणि रस्ते पाण्याखाली गेले. अचानक घरात आलेल्या पाण्यामुळे लोक घाबरले, गोंधळ उडाला.
या पाण्याचा दाब इतका जोरदार होता, की ते सुमारे १० फुटांपर्यंत उसळत होते. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास पाण्याची पाईपलाईन फुटली असल्याची माहिती मुंबई महापालिकेला कळविण्यात आली. मात्र, पालिकेचे अधिकारी गैरहजर असल्याचे स्थानिकांनी सांगितलं.
घाटकोपरमध्ये जलवाहिनी फुटली, रस्त्याला नदीचे स्वरूप, मोठे नुकसान#Mumbai #Ghatkopar #viral #Video pic.twitter.com/4QFfcXLLf8
— Satish Daud (@Satish_Daud) December 31, 2022
दरम्यान, या जलवाहिनीतून पाण्याचा वेग अद्यापही कमी झालेला नाही. घराबाहेर पडणारे लोक पाण्याचा वेग लवकरात लवकर कमी व्हावा अशी प्रार्थना करत आहेत. ही जलवाहिनी अतिशय जीर्ण झालेली आहे. त्यामुळे ही जलवाहिनी वारंवार फुटल्याच्या घटना घडत आहेत. या आधी देखील ही जलवाहिनी फुटून अक्षरश: घरे कोसळली होती. तर आता देखील ही जलवाहिनी फुटल्याने मोठे नुकसान झाल्याचे समजते आहे.