मुंबई : मुंबई येथे रेल्वे पोलिस दलाच्या (RPF) जवानांच्या तत्परतेमुळे एका प्रवाशाचा जीव वाचला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक प्रवासी धावत्या ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करताना अचानक खाली पडला. खाली पडल्यानंतर ती व्यक्ती प्लॅटफॉर्म व ट्रेन यांच्या दरम्यान अडकण्याची शक्यता वाटत असतानाच आरपीएफच्या जवानाने धावत जाऊन त्या व्यक्तीला वाचवले. मध्य […]
टॅग: Mumbai news
राज्यात आजपासून संध्याकाळी पाच वाजेनंतर संचारबंदी, असे असतील निर्बंध
पुणे : अत्यावश्यक सेवा वगळता संध्याकाळी पाचनंतर संपूर्ण राज्यात संचारबंदी असेल. कोरोनाव्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे राज्यातील शहरं आणि जिल्ह्यांमधील निर्बंधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. दुकानं आजपासून दुपारी चार वाजेपर्यंतच सुरु राहणार आहेत. राज्य सरकारने यापूर्वी पाच लेव्हलमध्ये निर्बंध शिथिल करण्याबाबत नियम बनवले होते. मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे समोर […]
ऑनलाइन वर्ग सुरु असताना काही विद्यार्थ्यांनी सुरु केला पॉर्न व्हिडिओ…
मुंबई : कोरोनाच्या संसर्गामुळे सध्या शाळा व महाविद्यालये ऑनलाइन माध्यमातून सुरू आहेत. मात्र, ऑनलाइन वर्ग सुरु असताना घडणाऱ्या अनेक विचित्र घटना समोर येत असतात. मुंबईतील विलेपार्ले येथील एका महाविद्यालयाचा ऑनलाइन वर्ग सुरू असताना अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. काही टवाळखोर विद्यार्थ्यांनी चालु वर्गात पॉर्न व्हिडिओ अपलोड केले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, ही […]
मुंबई पोलीस आयुक्तांनी जारी केला आदेश, जखमी व्यक्ती तक्रार दाखल करण्यासाठी आल्यास…
मुंबई : पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना आदेश जारी केला आहे. त्यानुसार, जखमी अवस्थेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्यांविषयी संवेदनशील दृष्टिकोन ठेवावा असे सांगितले आहे. आयुक्तांनी सर्व पोलिसांना निर्देश दिले आहेत की, जखमी व्यक्तीकडे प्रथम वैद्यकीय अहवाल (medical report) न मागता त्यांना लवकरात लवकर उपचार कसा मिळेल याला प्राधान्य द्यावे. […]
मालाडमध्ये तीन मजली इमारत चाळीवर कोसळून मोठी दुर्घटना, 11 जणांचा मृत्यू , 17 जण गंभीर जखमी
मुंबई : मुसळधार पावसामुळे मालाडमधील मालवणीमध्ये एक तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. ही घटना रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास घडली. न्यू कलेक्टर कंपाउंडमधील तीन मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला लगतच्या चाळीवर कोसळला. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल […]
मेट्रोच्या 2A आणि मेट्रो 7 चाचणीला मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा
मुंबई : मुंबईतील मेट्रो 2A आणि मेट्रो 7 चाचणीला आजपासून सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कांदिवलीतील आकुर्ली स्टेशनवरुन या चाचणीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यावेळी उपस्थित होते. येत्या ऑक्टोबर महिन्यात पहिला टप्पा सुरु होईल, असं सांगितलं जात […]
विरारमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला भीषण आग, १३ रुग्णांचा मृत्यू, पंतप्रधानांची मदतीची घोषणा
विरार : नाशिकमध्ये ऑक्सिजन यंत्रणेतील बिघाडामुळे 24 कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला होता. ही घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना मुंबईतील विरारमध्ये घडली आहे. विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीनंतर आग लागली असून त्यामध्ये १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री 3 ते 3.30 च्या दरम्यान […]
भारतात जाणं टाळा; अमेरिकन नागरिकांना ‘सीडीसी’चा सल्ला..
दिल्ली : देशात करोनाचं डबल म्युटेशन आढळून आलं असून, त्यामुळे करोना संक्रमणाचा प्रसार वेगानं होत असल्याचं तज्ज्ञाचं म्हणणं आहे. रुग्णालयात रुग्णांसाठी जागाच शिल्लक नसल्याचं चित्र असून, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा जाणवतं आहे. दुसरीकडे देशात झालेल्या कोरोना उद्रेकामुळे अनेक देश सर्तक झाले असून, अमेरिकेन नागरिकांना भारतात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अमेरिकेतील रोग […]
धक्कादायक : मुंबईत महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार; महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल…
मुंबई : सर्वसामान्य महिलांचे रक्षण करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यावरच बलात्काराची घटना मुंबईत घडली आहे. एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली असून, पीडितेने सहायक पोलीस निरीक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील डोंगरी पोलीस ठाण्यात पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याने सहायक पोलीस निरीक्षकाविरोधात […]
मुलुंडमध्ये वडील आणि आजोबांची हत्या करून तरुणाची आत्महत्या
मुंबई : एका तरुणाने स्वतःच्या वडील आणि आजोबांची हत्या करून स्वतः बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच मुलुंड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. मुलुंड पश्चिम येथील वसंत ऑस्कर बिल्डिंगमध्ये ही घटना घडली. शार्दूल मांगले असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आज (६ मार्च) सकाळी […]










