state government tightened restrictions again level 3 restrictions apllied
पुणे महाराष्ट्र

राज्यात आजपासून संध्याकाळी पाच वाजेनंतर संचारबंदी, असे असतील निर्बंध

पुणे : अत्यावश्यक सेवा वगळता संध्याकाळी पाचनंतर संपूर्ण राज्यात संचारबंदी असेल. कोरोनाव्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे राज्यातील शहरं आणि जिल्ह्यांमधील निर्बंधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. दुकानं आजपासून दुपारी चार वाजेपर्यंतच सुरु राहणार आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

राज्य सरकारने यापूर्वी पाच लेव्हलमध्ये निर्बंध शिथिल करण्याबाबत नियम बनवले होते. मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे समोर येत आहे. राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका देखील वाढू लागला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून आधीच्या नियमावलीमध्ये बदल करण्यात आले आहेत. आता राज्य सरकारने राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटात करण्याचा निर्णय जारी केला आहे.

पुण्यात काय सुरु काय बंद?

  1. आजपासून पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा अंतर्गत दुकाने आठवड्यातील सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.
  2. अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत सुरु राहतील तर शनिवार रविवार पूर्णपणे बंद राहतील.
  3. मॉल्स, सिनेमागृहं पूर्णपणे बंद.
  4. रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेने आणि शनिवार
  5. रविवार फक्त पार्सल सेवा 11 पर्यंत.
  6. उद्याने, मैदाने, जॉगिंग, रनिंग आठवड्यील सर्व दिवस पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत.
  7. खाजगी कार्यालयं कामाच्या दिवशी पन्नास टक्के क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहतील.
  8. अत्यावश्यक सेवा संबंधी शासकीय कार्यालये शंभर टक्के क्षमतेने सुरु राहतील.
  9. लग्नसमारंभाला 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी
  10. अंत्यसंस्कार, दशक्रिया विधी व त्यासंबंधित कार्यक्रमांना 20 लोकांच्या उपस्थितीची परवानगी
  11. पुण्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद
  12. कृषी संबंधित दुकाने आठवड्यातील सर्व दिवस दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत