Veteran actress Saira Bano admitted to the hospital due to health problems

अभिनेत्री सायरा बानो रुग्णालयात दाखल, आयसीयूमध्ये उपचार सुरु

मनोरंजन

मुंबई : अभिनेत्री सायरा बानो यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना ब्लड प्रेशर, हाय शुगर लेव्हल आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीन दिवसांपूर्वीच सायरा बानो यांना मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्या गेल्या 3 दिवसांपासून आयसीयूमध्ये दाखल आहेत. दिलीप कुमार यांच्या मृत्यूच्या दुःखातून त्या अजूनही सावरू शकलेल्या नाहीत. त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन होऊन जवळजवळ दोन महिने झाले आहेत, परंतु सायरा बानो त्यांच्या मृत्यूच्या दुःखातून सावरू शकलेल्या नाहीत. त्यांचा बीपी सामान्य होत नसून ऑक्सिजनची पातळी कमी राहत असल्यामुळे त्यांना श्वास घेण्यात अडचण येत आहे. परंतु, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. कदाचित, त्यांना आणखी तीन-चार दिवस रुग्णालयात राहावे लागेल.

दोन महिन्यांपूर्वी 7 जुलै रोजी दिलीप कुमार यांचे निधन झाले. दिलीप कुमार यांच्यासोबत 54 वर्षांपासून राहणाऱ्या सायरा बानो दिलीप कुमार यांचा मृत्यू झाल्यापासून कुणाशी बोलत नाहीत किंवा कोणालाही भेटत नाहीत. संपूर्ण जग विसरून त्यांनी दिलीप साहेबांच्या आठवणींना आपले संपूर्ण जग बनवले आहे. सायरा बानो 54 वर्षे दिलीप कुमार यांच्या सहवासात आणि त्यांच्या देखरेखीमध्ये व्यस्त होत्या. त्यांना या धक्क्यातून बाहेर पडणे आणि जगणे अवघड वाटत आहे. त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तीन दिवसांपूर्वी जेवण केल्यानंतर त्याची तब्येत बिघडली, म्हणून सायरा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सायरा स्वत: देखील 76 वर्षांच्या आहेत, दिलीप कुमार यांच्यासोबत लग्न झाले, तेव्हा सायरा 22 वर्षांच्या होत्या. यानंतर त्यांनी आयुष्यभर दिलीप कुमार यांची अतिशय मनापासून सेवा केली, आणि एक आदर्श ठेवला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत