OBC creamy layer
देश

संसद भवनातील 400 हून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली : संसद भवनात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. येथील 400 हून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. 6-7 जानेवारीला सर्वांची कोरोना चाचणी झाली होती. देशात ज्या प्रकारे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, ती खरोखरच चिंतेची बाब आहे. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक राज्यांमध्ये मंत्री आणि नेते ओमिक्रॉन आणि कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. […]

critical covid patients saved after oxygen
महाराष्ट्र मुंबई

राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ, ऑक्सिजनची मागणी देखील वाढली

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. काही रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. राज्यात ऑक्सिजनची मागणी देखील वाढली असून सध्या दररोज 424 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी आहे. दरम्यान, अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा होणार नसल्याचा दावा करत पुरेसा ऑक्सिजनसाठा असल्याचे म्हटले आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असून ऑक्सिजनची […]

When will the general public get the corona vaccine, informed Rajesh Tope
महाराष्ट्र

कोरोनाला आळा घालायचा असेल तर गर्दी टाळलीच पाहिजे – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : राज्यात कोरोनाला आळा घालायचा असेल तर गर्दी टाळलीच पाहिजे, यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता इतर गोष्टी बंद करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. पण राज्यात तुर्तास लॉकडाऊनची गरज नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबईत टास्क फोर्स आणि आरोग्य खात्याची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राजेश टोपे […]

Remedesivir injection - Dr. Sujay Vikhe
अहिल्यानगर महाराष्ट्र

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना कोरोनाची लागण

अहमदनगर : खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, आज माझी कोव्हिड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही. परंतु खबरदारी म्हणून मी स्वत: विलगीकरणात […]

कोरोना महाराष्ट्र

चिंता वाढली! राज्यात मागील 24 तासांत कोरोनाच्या 8067 नवीन रुग्णांची नोंद

मुंबई : महाराष्ट्रात मागील २४ तासांत ८,०६७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आणि ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग वाढत असल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात ओमिक्रॉन रुग्णांची संख्याही ४५४ झाली आहे. आरोग्य विभागाकडून ही आकडेवारी जारी करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पुणे येथे कोरोना रुग्ण संक्रमण दर वाढत आहे. आज राज्यात कोरोना […]

Stamp duty cut boosts construction sector, boosts state economy - Balasaheb Thorat
अहिल्यानगर महाराष्ट्र

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना कोरोनाची लागण

अहमदनगर : राज्याचे महसूलमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्वीट करून गुरुवारी रात्री ही माहिती दिली. सध्या राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग वाढत असतानाच अनेक नेत्यांना कोरोनाची लागण होत आहे. बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतीही लक्षणं नाहीत, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्यानं मी […]

Supriya Sule
महाराष्ट्र मुंबई

खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण

मुंबई : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. सुप्रिया आणि त्यांचे पती सदानंद या दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. ते सध्या विलगीकरणात राहत आहेत. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना आपली कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे. […]

Sourav Ganguly readmitted to hospital
क्रीडा

सौरव गांगुलीला कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल

बीसीसीआय अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सौरव गांगुलीला कोलकाता येथील वुडलँड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सौरव गांगुली कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी समजताच चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराच्या वाढत्या संकटादरम्यान ही बातमी चिंताजनक आहे. याआधी वर्षाच्या सुरुवातीला सौरव गांगुलीला प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करावे […]

Bollywood actor Amit Sadh infected with corona
मनोरंजन

बॉलीवूड अभिनेता अमित साध याला कोरोनाची लागण

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अमित साध याला कोरोनाची लागण झाली आहे. अमित याने स्वतःच सोशल मीडियावर याविषयी माहिती दिली आहे. तो सध्या विलगीकरणात असून घरीच उपचार घेत आहे. अमितने इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहून सांगितले की, “सर्व प्रकारची खबरदारी घेतल्यानंतरही तो कोविड-19 पॉझिटिव्ह झाला आहे. त्याला कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत आहेत. प्रोटोकॉलचे पालन करून मी स्वतःला […]

I am not sure that there will be an impartial inquiry into this case in the state - Raj Thackeray
महाराष्ट्र मुंबई

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना कोरोनाची लागण

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी आणि त्यांच्या मातोश्रींनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र, त्यांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं आहे. राज ठाकरेंना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत होती. त्यानंतर त्यांनी त्यांचे सर्व दौरे रद्द केले होते. त्यानंतर आता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. […]