राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ते 14 दिवस घरात क्वारंटाइन राहणार आहेत. त्यामुळे ईडीला चौकशीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. खडसे यांना भोसरी जमीन खरेदी प्रकरणी ईडीची नोटीस मिळाली आहे. चौकशीकरिता ईडी कार्यालयात हजर राहण्यासाठी खडसे मुंबइे येथे गेलेही होते. मात्र, त्यांना सर्दी, खोकला, ताप […]
टॅग: corona
चिंताजनक : भारतात कोरोनाव्हायरसच्या नव्या स्ट्रेनचा शिरकाव
भारतात कोरोनाव्हायरसच्या नव्या स्ट्रेनने बाधित एकूण सहा जण आढळले आहेत. भारत सरकारने याबाबत माहिती दिली आहे. युनायटेड किंग्डममधून परतलेल्या सहा जणांमध्ये कोरोनाचा नवीन जिनोम आढळला आहे. यापैकी तीन जणांचे नमुने बंगळुरुच्या निमहंसमध्ये, दोघांचे हैदराबादच्या सीसीएमबी आणि एकाचा नमुना पुण्याच्या एनआयव्हीमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याच्या अहवालातून ही चिंताजनक माहिती समोर आली आहे. या सहा जणांना […]
मोठी बातमी : कोवॅक्सिनच्या फेज -२ च्या चाचण्यांचा निकाल जाहीर; कोरोनापासून एक वर्षासाठी मिळणार संरक्षण
भारत बायोटेकने स्वदेशी लस-कोवॅक्सिनच्या फेज -२ च्या क्लिनिकल चाचण्यांचा निकाल जाहीर केला आहे. त्यानुसार ही लस कमीतकमी 12 महिन्यांपर्यंत कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यास सक्षम आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे ही लस सर्व वयोगटातील आणि स्त्रिया आणि पुरुषांसाठी एकसारखीच प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. सध्या या लसीची फेज-३ ट्रायल सुरू आहे. कंपनीने आपल्या लसीसाठी औषध नियामकांकडून तातडीची […]
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाताळ साजरा करण्यासाठी गृह विभागाने जारी केल्या मार्गदर्शक सूचना
मुंबई : कोविड-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या वर्षी नाताळ सण साध्या पद्धतीने व गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार साजरा करण्याचे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. ख्रिश्चन बांधवांनी या वर्षीचा नाताळचा सण साध्या पद्धतीने साजरा करावा. नाताळ सणानिमित्त चर्चमध्ये कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करावे. चर्चमध्ये त्यावेळी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार […]
रजनीकांतच्या चित्रपटाचे चित्रीकरण थांबवले, टीमच्या आठ सदस्यांना कोरोनाची लागण
हैदराबादमधील रामोजी फिल्मसिटी येथे सुरू असलेल्या रजनीकांतच्या ‘अण्णाथे’ चे शूट थांबविण्यात आले आहे. टीमच्या आठ सदस्यांची कोविड -१9 चाचणी पॉसिटीव्ह आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, रजनीकांत यांची कोविड -१9 चाचणी नकारात्मक आली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अभिनेता चेन्नईला परत येईल असा अंदाज वर्तविला जात होता, मात्र रजनीकांत यांनी हैदराबादमध्ये स्वत: ला विलगीकरणात ठेवण्याचे ठरवले […]
अभिनेत्री रकुल प्रीतला कोरोनाची लागण
अभिनेत्री रकुल प्रीत सिंहला कोरोनाची लागण झाली आहे. रकुल हैदराबादमध्ये अजय देवगन आणि अमिताभ बच्चन अभिनीत आगामी मेडे या चित्रपटाचे शूटिंग करत होती. रकुलने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करुन याबद्दल माहिती दिली. रकुलने ट्विट करत म्हटले कि, “मी कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून मी स्वत: ला विलगीकरणात ठेवले आहे. मला बरे वाटत आहे आणि विश्रांती […]
राज्यात उद्यापासून रात्रीची संचारबंदी, मुख्यमंत्र्यांनी दिल्या महत्वाच्या सूचना
मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. राज्यात उद्यापासून 5 जानेवारीपर्यंत महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. संपूर्ण युरोपीय देशांसह मध्य-पूर्व देशांकडून महाराष्ट्रात उतरणाऱ्या प्रवाशांना आजपासून […]
ब्रेकिंग : ब्रिटनहून येणाऱ्या सर्व उड्डाणांवर बंदी, नवीन कोरोना स्ट्रेनमुळे भारत सरकारचा निर्णय
ब्रिटनमध्ये कोरोनाचे नवीन स्ट्रेन मिळाल्यामुळे खळबळ उडाली आहे. यामुळे बर्याच युरोपियन देशांनी वाहतुकीवर निर्बंध घातले आहेत. यातच आता भारत सरकारने 31 डिसेंबरपर्यंत ब्रिटनहून येणाऱ्या उड्डाणांवरही बंदी घातली आहे. उड्डाणांवर बंदी आज रात्री 12 वाजता सुरू होईल. त्यापूर्वी येणाऱ्या प्रत्येक प्रवाश्यासाठी RT-PCR चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. भारत सरकारच्या वतीने ट्वीट करून असे सांगण्यात आले की […]
माजी क्रिकेटपटू विजय शिर्के यांचं कोरोनामुळे निधन
सचिन तेंडुलकरचे जवळचे मित्र आणि मुंबईकडून स्थानिक क्रिकेट खेळलेले माजी क्रिकेटपटू विजय शिर्के यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. त्यांच्यावर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. विजय शिर्के हे ८० च्या दशकात मुंबईकडून सचिन आणि विनोद कांबळी यांच्यासोबत खेळायचे. सचिनने ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सचिनने म्हटलं आहे, मी 15 वर्षाचा असल्यापासून विजय शिर्के […]
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचे घातक रूप, केंद्र सरकारने बोलावली तातडीची बैठक
नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचे नवे आणि घातक रुप समोर आले आहे. या रुपातील विषाणू वेगाने पसरत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. इंग्लंडचे मुख्य चिकित्सा अधिकारी क्रिस व्हिटी यांनी शनिवारी याला दुजोरा दिला आहे. कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनमुळे नेदरलँड, बेल्जियम, इटली आणि जर्मनीने यूकेमधून येणाऱ्या विमानसेवांवर बंदी घातली आहे. आता भारतात देखील ब्रिटनमधून येणाऱ्या […]










