मुंबई : राज ठाकरे यांच्या पत्राचा गांभीर्यानं विचार करु, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच, पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेऊ असंही फडणवीसांनी म्हटलं आहे. राज ठाकरेंनी आवाहन करणारं पत्र लिहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अंधेरी पोटनिवडणुकीत मनसेनं आम्हाला पाठिंबा द्यावा, यासाठी आज आशिष शेलार राज ठाकरे यांची भेट घेऊन […]
टॅग: BJP
नि:स्वार्थी मुख्यमंत्री ; एकाचवेळी पाच सरकारी बंगल्यांवर कब्जा; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई: ठाकरे गटाचा मुख्यमंत्र्यांवर नवा आरोप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकाचवेळी पाच सरकारी बंगले वापरण्यासाठी घेतले आहेत. मुख्यमंत्रीपदावरील ‘निस्वार्थी व्यक्ती’ एकाचवेळी पाच-सहा बंगल्यांवर ताबा ठेवते हा महाराष्ट्राच्या राजकारणातील विक्रम आहे, अशी खोचक टिप्पणी दैनिक ‘सामना’तील रोखठोक या सदरातून करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात असताना शिंदे यांनी ‘नंदनवन’ बंगला वास्तव्यासाठी घेतला. दोन सरकारी बंगले […]
सरकार-बिरकारच्या भरंवशावर राहू नका, नितीन गडकरींचा शेतकऱ्यांना सल्ला!
नागपूर : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या मिश्किल स्वभावामुळे सर्वपरिचित आहेत. अनेक सभा आणि कार्यक्रमांमधून नितीन गडकरींनी स्टेजवर केलेल्या भाषणात जोरदार टोलेबाजी केली आहे. अनेकदा तर त्यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारचे कान देखील टोचले आहेत. सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त करताना गडकरी मागेपुढे पाहात नाहीत, असा त्यांचा इतिहास आहे. या पार्श्वभूमवीर नितीन गडकरींचं भाषण म्हणजे […]
भूमिका बदलली नाही आणि शब्द पाळला तर ते शरद पवार कसले?: निलेश राणे
मुंबई: राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्धार केलेले संभाजीराजे छत्रपती यांचा पाठिंबा ऐनवेळी मागे घेतल्याच्या मुद्द्यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. हे होणारच होते. पवार साहेब आणि शब्द पाळला, असे होऊ शकत नाही. भूमिका बदलली नाही ते पवार साहेब कसले? राजे जर शिवसेनेसोबत जाणार तर संजय राऊत दुसऱ्या […]
भाजप नेते गणेश नाईकांवर कोणत्याही क्षणी अटकेची कारवाई, दोन्ही गुन्ह्यात अटकपूर्व जामीन फेटाळला
मुंबई : भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर लैंगिक अत्याचार आणि बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. नेरुळ आणि सीबीडी पोलीस ठाण्यातील दोन्ही गुन्ह्यात त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. ठाणे सत्र न्यायालयाने गणेश नाईक यांच्या विरोधातील दोन्ही गुन्ह्यात अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर गणेश नाईक आज हायकोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, ठाणे सत्र न्यायालयानं गणेश […]
सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलं, पंकजा मुंडे यांचा राज्य सरकारवर घणाघात
पुणे : ओबीसी आरक्षणावरून राज्यात वातावरण तापले आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. त्या म्हणाल्या की या सरकारला मला सांगायचंय, चुकून तुम्ही राज्यात सत्तेवर आलात, भविष्यात जनता तुम्हाला दारात देखील उभं करणार नाही. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलं. सरकारने 15 महिने फक्त गोल गोल फिरवलं, कुठलाही डेटा कोर्टात जमा केला […]
कॉंग्रेसला मोठा झटका! जितिन प्रसाद यांचा भाजपमध्ये प्रवेश
लखनौ : कॉंग्रेसला मोठा झटका बसला आहे. कॉंग्रेसचे दिग्गज आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी त्यांना दिल्लीतील भाजपा मुख्यालयात पक्षाचे सदस्यत्व मिळवून दिले. भाजपचे सदस्यत्व घेतल्यानंतर जितिन यांनी कॉंग्रेसवर टीका केली. ते म्हणाले की, आता फक्त भाजप पक्ष देशाच्या हितासाठी काम करीत आहे. उर्वरित […]
पहाटेच्या शपथविधीवर देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, ‘ती’ आमची चूकच, प्रतिमेला तडा गेला….
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत सत्ता स्थापन करण्याच्या निर्णयावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन केल्याचा पश्चाताप होत नाही. पण असं सरकार स्थापन करायला नको होतं. ती चूकच होती. शंभर टक्के सांगतो. ती चूकच होती. पण त्याचा पश्चाताप होत नाही, अशी कबुलीच देवेंद्र फडणवीस यांनी […]
धक्कादायक : भाजपाचे पदाधिकारी राजेंद्र पाटील यांची पत्नी आणि मुलीसमवेत आत्महत्या
जळगाव : भाजपाचे तालुका उपाध्यक्ष आणि एरंडोल तालुका शेतकी संघाचे संचालक राजेंद्र रायभान पाटील यांनी पत्नी आणि मुलीसह आत्महत्या केली आहे. त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दभाशी नजीकच्या पुलावरून तापी नदीत उडी घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तिघांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत. राजेंद्र रायभान पाटील (वय ५४), पत्नी वंदनाबाई राजेंद्र पाटील (वय […]
दिल्लीत भाजपा नेत्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्यामुळे खळबळ
दिल्ली : भाजपाच्या आणखी एका नेत्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. दिल्लीत भाजपा नेत्याने घराजवळील पार्कमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. पार्कमध्ये संध्याकाळी वॉकसाठी आलेल्या स्थानिकांनी पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. गुरविंदर सिंग बावा असं या भाजपा नेत्याचं नाव असून ते भाजपाचे पश्चिम दिल्लीचे माजी उपाध्यक्ष होते. दरम्यान, पोलिसांना […]










