नाशिक : शिवसेना नगरसेविका सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांचं कोरोनाच्या उपचारादरम्यान निधन झालं. त्यांनी शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख म्हणून अनेक वर्ष धुरा सांभाळली. त्यांच्या निधनाने महिला आघाडीला मोठा धक्का बसला असून मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. सत्यभामा गाडेकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. […]
टॅग: निधन
प्रसिद्ध सितारवादक देबू चौधरी यांच्यानंतर त्यांचा मुलगा प्रतीक चौधरी यांचे कोरोनाने निधन
प्रख्यात सितारवादक प्रतीक चौधरी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. गेल्या आठवड्यातच त्यांचे वडील आणि संगीतकार पंडित देवब्रत चौधरी यांचे कोरोना संसर्गाने निधन झाले होते. 49 वर्षीय प्रतीक चौधरी यांच्यावर दिल्लीतील गुरु तेग बहादूर रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु, गुरुवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संगीत इतिहासकार पावन झा यांनी ट्विटरद्वारे ही बातमी शेयर केली. ते म्हणाले […]
लोकप्रिय अभिनेता पांडू यांचं कोरोनामुळे निधन, तमिळ चित्रपटसृष्टीला मोठा धक्का
अभिनेता पांडू यांचे आज कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ७४ वर्षांचे होते. ते तमिळ चित्रपटांमधील लोकप्रिय हास्यकलाकार होते. पांडू यांच्या पत्नी कुमुधा यांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या अजूनही आयसीयूमध्ये आहेत. पांडू यांच्या पश्चात पत्नी कुमुधा आणि तीन मुले प्रभु, पाचू आणि पिंटू असा परिवार आहे. तमिळ चित्रपटसृष्टीतील […]
‘अपराजिता’ फेम अभिनेत्री श्रीप्रदा यांचे कोरोनाने निधन
अभिनेत्री श्रीप्रदा यांचे कोरोनाने निधन झाले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु, कोविडसंबंधित गुंतागुंत वाढल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. अखेर त्यांचे निधन झाले. सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनचे (CINTAA) सरचिटणीस अमित बहल यांनी श्रीप्रदा यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. अभिनेत्री श्रीप्रदा यांनी अभिनेता गोविंदा, धर्मेंद्र, विनोद खन्ना आणि रवी […]
‘बापमाणूस’ फेम अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचं कोरोनामुळे निधन
मुंबई : अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. त्यांच्यावर चार दिवस आयसीयूमध्ये उपचार सुरु होते, परंतु काल दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. अभिलाषा पाटील काही दिवसांपूर्वी चित्रीकरणासाठी बनारसला गेल्या होत्या. परंतु त्यांना ताप आल्यामुळे त्या मुंबईला परतल्या, त्यानंतर कोरोना चाचणी केली असता त्यांना कोरोना झाल्याचं […]
लोकप्रिय अँकर कनुप्रिया यांचे कोरोनामुळे निधन
अभिनेत्री आणि अँकर कनुप्रिया यांचे कोरोनामुळे निधन झालं आहे. ब्रह्माकुमारी शिवानी यांनी ही माहिती सोशल मीडियावर दिली आहे. कनुप्रिया खूप लोकप्रिय अँकर होत्या. त्यांच्या निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. कनुप्रियाने दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती आणि सांगितलं होतं की मी रुग्णालयात दाखल आहे आणि माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. अहवालानुसार, ऑक्सिजनची पातळी […]
प्रसिद्ध अभिनेता बिक्रमजित कंवरपाल यांचे कोरोनामुळे निधन
नवी दिल्ली : बॉलिवूड इंडस्ट्रीमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता बिक्रमजित कंवरपाल यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. 52 वर्षीय बिक्रमजित यांच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबासह चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. बिक्रमजित कंवरपाल यांचा जन्म हिमाचल प्रदेशात एका आर्मी ऑफिसरच्या घरात झाला होता. विक्रमजीत स्वतः देखील सैन्यात नोकरीस […]
धक्कादायक : लोकप्रिय न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं निधन
आज तकचे न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं आहे. त्यांच्यावर दिल्लीत करोनावर उपचार सुरू होते. पण याचदरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं. टीव्ही जगतात रोहित सरदाना हे एक मोठं नाव होतं. रोहित सरदाना यांनी झी न्यूजसोबत प्राईम टाईम अँकर म्हणून काम केलं. त्यानंतर ते झी न्यूजमधून आज तकमध्ये आले […]
वेगवान गोलंदाज अश्विन यादव याचे अकाली निधन, क्रिकेट विश्वावर शोककळा
मुंबई : हैदराबादचा माजी वेगवान गोलंदाज अश्विन यादव याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. तो 33 वर्षांचा होता. त्यामुळे भारतीय क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. आपल्या गोलंदाजीच्या खास शैलीसाठी अश्विन यादव ओळखला जायचा. त्याच्या पश्चात पत्नी आणि त्याची तीन मुले आहेत. भारतीय संघाचे फिल्डिंग कोच आर श्रीधर यांनी अश्विनच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. त्यांनी ट्विट […]
प्रसिद्ध अभिनेता अमित मिस्त्री यांचे निधन, मनोरंजन विश्वात शोककळा
नवी दिल्ली : अभिनेता अमित मिस्त्री यांचे निधन झाले आहे. आज (23 एप्रिल) हृदयविकाराच्या झटक्यामुळे अमित मिस्त्री यांचे निधन झाले. ते ४७ वर्षांचे होते. अमित यांच्या निधनाची बातमी समजताच मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. अमित टीव्ही आणि बॉलिवूडमधील नामांकित अभिनेता होता. अमित यमला पगला दिवाना, शोर इन द सिटी, एक चालीस लास्ट लोकल, शशश.. कोई […]










