मुंबई : मुंबई उपनगरातील कांजूरमार्ग येथील सॅमसंग सर्व्हिस सेंटरला आज संध्याकाळी भीषण आग लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या भागात धुराचे उंचच उंच लोट उठत आहेत. कांजूरमार्ग पूर्वेकडील कांजूरमार्ग पोलीस स्टेशनजवळील सॅमसंग सर्व्हिस सेंटरमध्ये लेव्हल 2 ची आग लागली. रात्री 8.59 वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात गाड्या […]
टॅग: मुंबई
पाकिस्तान विरुध्द भारताच्या पराभवानंतर काही खेळाडूंविषयी उमटलेल्या प्रतिक्रिया अशोभनीय
मुंबई : पाकिस्तान विरुध्दच्या सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर काही खेळाडूंविषयी उमटत असलेल्या प्रतिक्रिया या अशोभनीय असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. वानखेडे स्टेडियम येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत लिटल मास्टर सुनील गावस्कर यांच्या नावे “द सुनील गावस्कर हॉस्पिटॅलिटी बॉक्स” आणि माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या नावाने स्टेडियम […]
गार्डनमध्ये खेळताना पाईपलाईन दुरुस्तीसाठी खणलेल्या खड्ड्यात पडून 2 मुलांचा दुर्दैवी मृत्यू
मुंबई : मुंबईच्या ॲन्टॉप हिल परिसरात गार्डनमध्ये खेळताना खड्ड्यात पडून 2 लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 12 वर्षीय यशकुमार चंद्रवंशी आणि 9 वर्षीय शिवम जैस्वाल अशी मृत मुलांची नावे आहेत. ही मुले उद्यानात खेळत होती. मात्र, पाईपलाईन दुरुस्तीकरीता खणण्यात आलेल्या खड्ड्यात पडून त्यांचा मृत्यू झाला. अँटॉप हिलमधल्या सेक्टर 7 परिसरात ही घटना घडली आहे. […]
‘या’ जिल्ह्यांमध्ये काही वेळात 30-40 किमी प्रतितास तीव्रतेच्या वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता
मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून राज्यात अनेक भागांमध्ये गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी, ठाणे सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पालघर, रायगड आणि मुंबई येथे पुढील 3-4 तासांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आताच वर्तवलेल्या अंदाजानुसार, या जिल्ह्यांमध्ये 30-40 किमी प्रतितास इतक्या तीव्रतेने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर […]
मुंबईतील ६ किल्ल्यांसाठी एकत्रित विकास आराखडा तातडीने तयार करावा, अमित देशमुख यांचे निर्देश
मुंबई : मुंबईतील शिवडी, वरळी, वांद्रे, धारावी, सेंट जॉर्ज आणि माहिम अशा 6 किल्ल्यांसाठी एकत्रित विकास आराखडा तातडीने तयार करण्यात यावा, अशा सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी आज दिल्या. गड- किल्ल्यासंदर्भातील आढावा बैठक आज मंत्रालयात सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, पुरातत्व […]
ड्रग्ज पार्टी प्रकरण : शाहरुखचा मुलगा आर्यनसह तीन जणांना अटक
मुंबई : मुंबई येथून गोव्याला जात असलेल्या क्रूझवर शनिवारी रात्री उशिरा एनसीबीच्या पथकाने छापा टाकला होता. एनसीबीने क्रूझवर केलेल्या कारवाईत ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. या क्रूझवरून शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आठ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. एनसीबीने या सर्वांची कसून चौकशी केली, त्यानंतर काही वेळापूर्वीच अटकेची कारवाई करण्यात आली आहे. एनसीबीने शाहरुखचा मुलगा आर्यन […]
मुंबई- गोवा क्रूझवर एनसीबीची कारवाई, शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान NCBच्या ताब्यात
मुंबई : मुंबईच्या अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (NCB) मुंबईहून गोव्याला निघालेल्या मोठ्या क्रूझवर कारवाई करत ड्रग पार्टी करणाऱ्यांना अटक केली आहे. एनसीबीची ही कारवाई अतिशय गुप्तपणे सुमारे ७ तास सरू होती अशी माहिती आहे. या प्रकरणी आतापर्यंत एकूण १३ जणांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. दरम्यान यावेळी क्रूझवर बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानदेखील उपस्थित […]
VIDEO : कारचालकाने अचानक घेतला युटर्न, दोन दुचाकीस्वारांचा दुर्दैवी मृत्यू
मुंबई : कारचालकाने अचानक युटर्न घेतल्यामुळे झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लोअर परळ येथे सेनापती बापट मार्गावरील उड्डाणपुलावर हा अपघात घडला. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ही घटना घडली आहे. कार चालकाने वेग कमी न करता अचानक युटर्न घेतला. मात्र, यावेळी समोरुन येणाऱ्या दुचाकीला कारचा धक्का लागला. […]
मुंबईत आणखी एका दहशतवाद्याला ATS कडून अटक
मुंबई : महाराष्ट्र ATS ने मोठी कारवाई करत एका संशयित दहशतवाद्याला मुंबईतील वांद्रे परिसरातून अटक केली आहे. मागील महिन्याभरात यासंबंधातली मुंबईतील ही तिसरी अटक आहे. इंडियन एक्सप्रेसने या संदर्भातील वृत्त दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्याचे नाव मोहम्मद इरफान रेहमत अली शेख आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या झाकीर आणि रिझवान या दहशतवाद्यांनंतर […]
टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या पेस्टने दात घासल्याने तरुणीचा मृत्यू
मुंबई : मुंबईतील धारावीत राहणाऱ्या 18 वर्षीय अफसाना खान हिचा टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या औषधाने दात घासल्याने मृत्यू झाला आहे. बाथरुममध्ये टूथपेस्टच्याच बाजूला उंदीर मारण्याची पेस्ट ठेवलेली असल्यामुळे शुक्रवारी सकाळी अफसानाने टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याची पेस्ट ब्रशवर घेतली आणि दात घासले, त्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 18 वर्षीय अफसाना खान सकाळी उठली […]










