मुंबई : मुंबई उपनगरातील कांजूरमार्ग येथील सॅमसंग सर्व्हिस सेंटरला आज संध्याकाळी भीषण आग लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या भागात धुराचे उंचच उंच लोट उठत आहेत.
कांजूरमार्ग पूर्वेकडील कांजूरमार्ग पोलीस स्टेशनजवळील सॅमसंग सर्व्हिस सेंटरमध्ये लेव्हल 2 ची आग लागली. रात्री 8.59 वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात गाड्या आणि पाण्याचे चार टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही.
Maharashtra: Fire breaks out at Samsung Service Centre in Kanjurmarg East, Mumbai; 7 fire engines and 4 water tankers moved to the spot; no casualties reported.
— ANI (@ANI) November 15, 2021




