Three arrested including Shah Rukh son Aryan Khan
महाराष्ट्र मुंबई

ड्रग्ज पार्टी प्रकरण : शाहरुखचा मुलगा आर्यनसह तीन जणांना अटक

मुंबई : मुंबई येथून गोव्याला जात असलेल्या क्रूझवर शनिवारी रात्री उशिरा एनसीबीच्या पथकाने छापा टाकला होता. एनसीबीने क्रूझवर केलेल्या कारवाईत ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. या क्रूझवरून शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आठ जणांना ताब्यात घेण्यात आले होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

एनसीबीने या सर्वांची कसून चौकशी केली, त्यानंतर काही वेळापूर्वीच अटकेची कारवाई करण्यात आली आहे. एनसीबीने शाहरुखचा मुलगा आर्यन खान, त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मूनमून धामेचा या तीन जणांना अटक केली आहे. एनडीपीएस अ‍ॅक्टच्या सेक्शन २७ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. या सर्वांची आता वैद्यकीय चाचणीही करण्यात येणार असून त्यासाठी त्यांना जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत