मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे कि, आपण जो निकाल पाहतोय त्यावरून काहीतरी गडबड असल्याचे दिसत आहे. हा जनतेचा निर्णय नाही. इथे काय चूक आहे ते प्रत्येकाला समजेल. महायुतीने असं काय केलं की, त्यांना १२० पेक्षा जास्त जागा मिळत आहेत? महाराष्ट्रात महविकास आघाडीला ७५ जागाही मिळत नाही हे कसं शक्य आहे?
“दोन दिवसांपूर्वी अदानी यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यात भाजपचे संपूर्ण गुपित उघड झाले होते, त्यांच्याकडून लक्ष हटवण्यासाठी हे सर्व केले गेले आहे. मुंबई गौतम अदानींच्या खिशात जात आहे. आम्ही अदानींचे मन जाणतो. महाराष्ट्रातील लोकांनी आमच्या ४-५ जागा चोरल्या आहेत, राज्यातील लोक बेईमान नाहीत. Ballet paper (मत पत्रिका) वर पुन्हा निवडणुका घ्या. महाराष्ट्राचा निकाल हा जनमताचा कौल नाही! नाही! नाही! त्रिवार नाही! असा निकाल लागूच शकत नाही”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
सध्या महायुती २१९ जागांवर आघाडीवर आहे. तर महाविकास आघाडी ५८ जागांवर पुढे आहे. येथे मुख्य लढत सत्ताधारी महायुती (भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी) आणि महाविकास आघाडी (काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी (शरद पवार)) यांच्यात आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विधानसभेच्या २८८ जागांसाठी सर्व पक्षांचे सुमारे ४,१३६ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांपैकी २,०८६ अपक्ष आहेत. १५०हून अधिक जागांवर बंडखोर उमेदवार रिंगणात असून महायुती आणि मविआचे उमेदवार त्यांच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध लढत आहेत.




