अहिल्यानगर : संगमनेर मतदारसंघातून बाळासाहेब थोरातांचा पराभव झाला आहे. तर पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे अमोल खताळ जायंट किलर ठरले आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान पार पडलं असून त्याचा निकाल आज २३ नोव्हेंबर रोजी लागत आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार झाली. सुरुवातीपासूनच महायुतीने आघाडी घेतली होती. ती आघाडी कायम ठेवत आता भाजपने तब्बल महायुतीने २२२ जागांवर आघाडी घेतली आहे. तर, महाविकास आघाडी ५६ जागाांवर आघाडीवर आहे.




