मुंबई : पालघर जिल्ह्यातील दि जव्हार अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या नोकर भरती प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असल्याने बँकेच्या कामकाजावर परिणाम होत आहे. त्याअनुषंगाने बँकेच्या अधिकाऱ्यांनी नोकर भरतीच्या काही तरतुदींमध्ये बदल करण्याची विनंती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना बैठकीमध्ये केली. त्यानुसार प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले. दि जव्हार अर्बन को […]
टॅग: मुंबई
वांद्रे शासकीय वसाहतीतील रहिवाशांना कायमस्वरूपी घरे देण्याबाबत शासन कटिबद्ध – मंत्री शिवेंद्रसिंह भोसले
नागपूर : वांद्रे शासकीय वसाहतीत वास्तव्यास असलेल्या नागरिकांना कायमस्वरूपी घरे देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने आधीच घेतला असून, या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. विधानसभा सदस्य वरुण सरदेसाई यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे प्रश्न विचारला असता त्यावर मंत्री भोसले यांनी माहिती दिली. मंत्री भोसले म्हणाले की, […]
मुंबईत फनेल झोनमुळे रखडलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
नागपूर : मुंबईतील फनेल झोनमुळे रखडलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी राज्य शासनाने तयार केलेल्या नवीन योजनेची महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत केली. या योजनेमुळे मुंबईतील हजारो पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागणार आहेत. मुंबई विमानतळाच्या बाजूला असलेल्या इमारतींचा फनेल झोन व इतर तांत्रिक अडथळ्यांमुळे अनेक इमारतींचा पुनर्विकास शक्य होत नव्हता. परिणामी उपलब्ध असलेला संपूर्ण चटई […]
मुंबईत ५० एकरपेक्षा मोठ्या भूखंडांवर‘क्लस्टर रिडेव्हलपमेंट’ राबवणार; पहिल्या टप्प्यात १७ प्रकल्पांची निवड
मुंबईत ५० एकरपेक्षा मोठ्या भूखंडांवर‘क्लस्टर रिडेव्हलपमेंट’ राबवणार; पहिल्या टप्प्यात १७ प्रकल्पांची निवड मुंबई झोपडपट्टीमुक्तीसाठी राज्य शासनाचे मोठे पाऊल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत घोषणा एसआरए अभय योजनेला ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ एसआरए प्रकल्प तक्रार जलद निपटाऱ्यासाठी एजीआरसीची संख्या वाढविणार म्हाडाच्या ओसीसाठीच्या अभय योजनेला देखील एक वर्षाची मुदतवाढ नागपूर : मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पामधील […]
मुंबईतील संरक्षण क्षेत्रालगतच्या व फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी ‘हाउसिंग फॉर ऑल’ नवी योजना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : संरक्षण क्षेत्रालगतच्या व फनेल झोनमधील मर्यादांमुळे पुनर्विकास रखडलेल्या इमारतींचा पुनर्विकास सुलभ करण्यासाठी राज्य शासनाने ‘हाउसिंग फॉर ऑल’ ही नवी योजना आणल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा व विधानपरिषदेत निवेदनाद्वारे सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबईतील अनेक भागांमध्ये संरक्षण क्षेत्रालगतची जमीन, फनेल झोन तसेच इतर तांत्रिक कारणांमुळे पूर्ण क्षमतेने पुनर्विकास करणे शक्य होत नव्हते. […]
नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या काही मतदारसंघातील सार्वजनिक सुट्टी रद्द
मुंबई : नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होत आहे. यापूर्वी मतदानाच्या दिवशीची जाहीर केलेली सुट्टी काही मतदारसंघात न्यायालयीन अपील दाखल झाल्यामुळे केवळ त्या मतदारसंघापुरती रद्द करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी 16 जिल्ह्यांतील नगरपरिषद/नगरपंचायतीमध्ये सार्वजनिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे. यात ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, अहिल्यानगर […]
वर्सोवा मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सहा महिन्यांच्या प्रशिक्षण सत्राचे आयोजन
मुंबई : मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार साधण्यासाठी वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन तसेच सागरी डिझेल इंजिन देखभाल व परिचालन या सहा महिन्यांच्या 135 व्या सत्राचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण 1 जानेवारी 2026 ते 30 जून 2026 या कालावधीत होत असून पात्र मच्छिमारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या प्रशिक्षणात मत्स्यव्यवसाय […]
इमारत देखभाल व दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुमारे १९४ कोटी रुपयांच्या निधीचे वितरण
मुंबई : इमारत देखभाल दुरुस्ती आणि नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीची कामे सुरळीत व्हावीत यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नागपूर मंडळाकडे सुमारे १९४ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने कळविले आहे. या पैकी १५१ कोटी १९ लाख रुपयांचा निधी गेल्या वर्षीच देण्यात आला आहे. तो इमारत देखभाल दुरुस्तीसाठीचा आहे. तर नागपूरचे हिवाळी अधिवेशन […]
अभिनेता गोविंदाची तब्येत बिघडली, अचानक बेशुद्ध पडल्याने जुहूच्या रुग्णालयात दाखल
मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा काही काळासाठी बेशुद्ध पडल्याने त्याला जुहू येथील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री मुंबईतील जुहू येथील स्वतःच्या घरी तो अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडला. त्याला सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे आणि त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचे कायदेशीर सल्लागार आणि मित्र ललित बिंदल यांनी याबाबत […]
मरीन ड्राइव्हवर दोन कारची जोरदार धडक, भीषण अपघातानंतर दोन्ही वाहनांनी घेतला पेट
मुंबई : शुक्रवारी रात्री मरीन ड्राइव्ह परिसरात दोन कारमध्ये झालेल्या भीषण अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली. हा अपघात रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास झाला. टक्कर इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांनी पेट घेतला आणि काही वेळातच परिसरात धुराचे लोट पसरले. दरम्यान, अचानक झालेल्या या घटनेमुळे स्थानिकांमध्ये घबराट निर्माण झाली. तथापि, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी […]










