मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र झाल्यामुळे राज्यात पावसाने जोर धरला आहे. मुंबईसह मराठवाड्यात पाऊस सुरूच असून आजही मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि गुजरात राज्यासह उत्तर कोकणात ढगांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत असल्याने मुंबईसह उपनगरात व अलिबाग, ठाणे, माथेरान, कल्याण येथे […]
टॅग: पालघर
नितीन गडकरींची मोठी घोषणा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी १०० कोटींच्या मदतीला मंजुरी
नवी दिल्ली : महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये भीषण परिस्थिती ओढवली होती. याचा रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूरला मोठा फटका बसला. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मुसळधार पावसाचा फटका बसलेल्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला १०० कोटींची मदत घोषित करण्यात आली आहे. केंद्रीय परिवहन मंत्री […]
राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध, उर्वरित जिल्ह्यात ‘या’ निर्बंधांमध्ये सूट, जाणून घ्या..
मुंबई : राज्यातील कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर असलेल्या ११ जिल्ह्यांत ब्रेक दि चेन अंतर्गत तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम ठेवण्यात आले असून मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या ३ जिल्ह्यांत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्बंधांबाबत ठरविणार आहे. हे १४ जिल्हे सोडून राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये निर्बंधांमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने यासंदर्भात साथरोग […]
हवामान खात्याकडून नऊ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी, पुढील काही तास महत्वाचे
मुंबई : भारतीय हवामान खात्याकडून आज मुंबईसह एकूण नऊ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहेत. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे. आज संपूर्ण कोकण विभागाला आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. तर संबंधित जिल्ह्यात उद्यापासून सलग चार […]
फटाके बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट, मदत आणि बचावकार्य सुरू
पालघर : पालघरच्या डहाणू तालुक्यातील देहाणे येथे एका फटाके बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट झाला आहे. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोट इतका भयंकर होता की त्याचा आवाज ५ किलोमीटरच्या परिसरात ऐकू आला. तर, सुमारे पाच ते १० किलोमीटर परिसरातील घरांना या स्फोटामुळे मोठे धक्के जाणवले. कारखान्यातून निघणारा धूर कित्येक किलोमीटर अंतरावरही दिसंत आहे. […]
हवामान खात्याकडून राज्यात ऑरेंज अलर्ट जारी, आज अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा
मुंबई : मुंबईत मान्सून दाखल झाला असून आठवडाभरापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज पावसाने विश्रांती घेतली असली तरी ढगाळ वातावरण कायम आहे. हवामान खात्याने राज्यात ४८ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आज मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापुर, सातारा व घाटमाथ्यासह संपूर्ण महाराष्ट्र ऑरेंज […]
राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरूवात, पुढील ३ तास महत्त्वाचे
मुंबई : मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मध्यम ते तीव्र पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबईला वादळाचा धोका नसला तरी हे चक्रीवादळ मुंबईनजीकच्या समुद्रातून जाणार असल्याने त्याच्या प्रभावाने मुंबईत पाऊस होण्यासह वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. त्यानुसार मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट […]
Cyclone Tauktae : ‘तौत्के’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी यंत्रणांना दिला सतर्कतेचा इशारा
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अरबी समुद्रातील तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीवरील भागात सतर्कता ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक ते बचाव कार्य करावे, अशा सूचना त्यांनी प्रशासनास दिल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीच्या पूर्वतयारी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडून आढावा घेतला. पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या […]
लिव इन पार्टनरने केली प्रेयसीची हत्या, फ्लॅटच्या भिंतीत गाडला मृतदेह
महाराष्ट्रातील पालघर येथील वृंदावन दर्शन कॉम्प्लेक्समध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या लिव इन पार्टनरचा खून केला आणि मृतदेह फ्लॅटच्या भिंतीत गाडला. ही घटना उघडकीस आल्यानंतर सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सूरज हरमलकर आणि त्याची लिव इन पार्टनर अमिता मोहिते हे दोघे वृंदावन दर्शन कॉम्प्लेक्सच्या फ्लॅट नंबर 101 मध्ये […]
नालासोपाऱ्यात रेल्वे रुळावर आढळले एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह
नालासोपारा : नालासोपारा आणि वसई रेल्वे स्थानकाच्या जवळ एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आले आहेत. रेल्वे ट्रॅकवर मालगाडीखाली आल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे तर एक दहा वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे. वसई रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतकांमध्ये ५५ वर्षीय महिला, ३५ वर्षीय मुलगी आणि ३१ वर्षीय मुलाचा समावेश आहे. तर १० वर्षीय […]










