मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र झाल्यामुळे राज्यात पावसाने जोर धरला आहे. मुंबईसह मराठवाड्यात पाऊस सुरूच असून आजही मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि गुजरात राज्यासह उत्तर कोकणात ढगांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत असल्याने मुंबईसह उपनगरात व अलिबाग, ठाणे, माथेरान, कल्याण येथे मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तसंच, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही भागात वादळी वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
latest satellite obs at 10 am, 1 st Sept, indicates dense clouds over North Konkan including Mumbai Thane Palghar, North Madhya Mah and Gujarat state.
Watch for severe weather warnings from IMD for these regions. pic.twitter.com/ctJM03rZhu— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 1, 2021




