weather alert today red alert to 9 districts in the state
महाराष्ट्र

हवामान खात्याकडून नऊ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी, पुढील काही तास महत्वाचे

मुंबई : भारतीय हवामान खात्याकडून आज मुंबईसह एकूण नऊ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहेत. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे. आज संपूर्ण कोकण विभागाला आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. तर संबंधित जिल्ह्यात उद्यापासून सलग चार दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आज मुंबईसह, पुणे, पालघर, ठाणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या नऊ जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. संबंधित जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय, पुढील तीन तासांत मुंबई, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, सोलापूर, उस्मानाबाद आणि घाट परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान आकाशात विजांच्या गडगडाटासह वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहेत. त्यामुळे लांबचा प्रवास टाळण्याचा आणि मोठ्या झाडाखाली उभे न राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत