नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरबाबत लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी, विक्रम मिस्री (परराष्ट्र सचिव), कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सैन्याच्या कारवाईवर आपले विचार व्यक्त केले. पत्रकार परिषदेदरम्यान, लष्कराने दहशतवादाविरुद्धचा एक व्हिडीओ देखील दाखवला ज्यामध्ये मध्य प्रदेश हल्ला, २६/११ हल्ला आणि पहलगाम हल्ला दाखवण्यात आला होता. कर्नल सोफिया कुरेशी […]
टॅग: पाकिस्तान
भयंकर! नवजात बाळाचे डोके तुटून आईच्या पोटातच राहिले, पाकिस्तानमध्ये आरोग्य कर्मचार्यांचा निष्काळजीपणा
पाकिस्तान : पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील ग्रामीण आरोग्य केंद्रामध्ये गंभीर वैद्यकीय निष्काळजीपणाचे प्रकरण समोर आले आहे. या आरोग्य केंद्रातील कर्मचार्यांनी एका नवजात बाळाचे डोके कापून ते आईच्या पोटातच सोडले, ज्यामुळे 32 वर्षीय हिंदू महिलेचा जीव धोक्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, “थरपारकर जिल्ह्यातील दूरवरच्या खेड्यात राहणारी हिंदू महिला तिच्या भागातील ग्रामीण आरोग्य केंद्रात (आरएचसी) गेली होती, परंतु स्त्रीरोगतज्ज्ञ […]
भारताने तब्बल १६ गोल करत पाकिस्तानला दिला सर्वात मोठा धक्का..
जकार्ता : आशिया चषक हॉकी स्पर्धेतील पहिले चार संघ हे विश्वचषकासाठी पात्र ठरणार होते. भारताने पाकिस्तानला मागे सारून अव्वल चारमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पाकिस्तानच्या वर्ल्ड कपसाठी पात्र ठरण्याच्या अपेक्षाही धुळीस मिळाल्या. भारताच्या नवोदित हॉकीपटूंनी आक्रमक खेळाच्या जोरावर आशिया कप हॉकी स्पर्धेत इंडोनेशियाचा धुव्वा उडवून अव्वल चार संघांत स्थान मिळवले. पाकिस्तानला मागे टाकून अव्वल चार संघांत […]
पाकिस्तानातील कराची विद्यापीठाच्या परिसरात भीषण स्फोट, 4 जणांचा मृत्यू
कराची : पाकिस्तानातील कराची विद्यापीठात भीषण स्फोट झाला आहे. पाकिस्तानच्या जिओ न्यूजनुसार, विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये हा स्फोट झाला. या स्फोटात तीन चिनी नागरिकांसह चार जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यात दोन महिलांचा समावेश आहे. तर अनेक जण गंभीर जखमी आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. मस्कन चौरंगीजवळ एका […]
मोठी बातमी! UGC आणि AICTE कडून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी पाकिस्तानला न जाण्याचा सल्ला, जाणून घ्या…
विद्यापीठ अनुदान आयोग आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने शनिवारी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी पाकिस्तानला न जाण्याचा सल्ला दिला आहे. पाकिस्तानमध्ये प्राप्त केलेल्या शैक्षणिक पात्रतेवर भारतात नोकरी मिळत नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. कोणताही भारतीय नागरिक किंवा भारतातील परदेशी नागरिक जो पाकिस्तानच्या कोणत्याही पदवी महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छितो तो पाकिस्तानमध्ये प्राप्त केलेल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर भारतात […]
शाहबाज शरीफ यांनी दाखवले खरे रंग, पाकिस्तानचे नवे पंतप्रधान बनण्याआधीच काश्मीर मुद्द्यावर केले ‘हे’ वक्तव्य
इम्रान खान यांची पाकिस्तानच्या सत्तेतून हकालपट्टी करण्यात आली असून माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे भाऊ शाहबाज शरीफ हे नवे वझीर-ए-आझम बनण्याच्या मार्गावर आहेत. सोमवारी पाकिस्तानच्या संसदेत नव्या पंतप्रधानांची घोषणा होणार आहे. शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान होण्यापूर्वीच आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. जोपर्यंत काश्मीर प्रश्न सुटत नाही तोपर्यंत भारतासोबत कोणतीही चर्चा होणार नसल्याचे शाहबाज […]
पाकिस्तान विरुध्द भारताच्या पराभवानंतर काही खेळाडूंविषयी उमटलेल्या प्रतिक्रिया अशोभनीय
मुंबई : पाकिस्तान विरुध्दच्या सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर काही खेळाडूंविषयी उमटत असलेल्या प्रतिक्रिया या अशोभनीय असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. वानखेडे स्टेडियम येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत लिटल मास्टर सुनील गावस्कर यांच्या नावे “द सुनील गावस्कर हॉस्पिटॅलिटी बॉक्स” आणि माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या नावाने स्टेडियम […]
भारतावर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळला, पाकिस्तानी दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांकडून अटक
नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक केली आहे. स्पेशल सेलने या दहशतवाद्याकडून एके 47 आणि हातबॉम्ब देखील जप्त केले आहेत. भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने या दहशतवाद्याला तयार केला होता. आता दहशतवाद्याला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी केली जात आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने सांगितले की, मोहम्मद […]
पाकिस्तानच्या संसदेमध्ये जोरदार राडा, सत्ताधारी-विरोधकांमध्ये हाणामारी आणि शिविगाळ
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या संसदेमध्ये मंगळवारी (१5 जून) जोरदार राडा झाला. संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या नॅशनल असेंब्लीमध्ये सत्ताधारी पीटीआय आमि विरोधी पक्षाच्या खासदारांनी एकमेकांना फाइली फेकून मारल्या तसेच शिवीगाळ केला. संसदेत सुरु असलेल्या या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षा रक्षकांना सभागृहात बोलवावे लागले. वृत्तानुसार, मंगळवारी फेडरल बजेट २०२२-२२ च्या सर्वसाधारण चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते शहबाज शरीफ यांनी बोलण्याचा […]
कुलभूषण जाधव यांना दिलासा, शिक्षेविरोधात पाकिस्तानमधील वरिष्ठ न्यायालयात अपील करण्याची संधी
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावलेले भारतीय माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या दबावामुळे पाकिस्तानच्या नॅशनल असेम्ब्लीने कुलभूषण जाधव यांना वरिष्ठ कोर्टात अपील करण्याची मंजुरी देणाऱ्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. लष्करी कोर्टाने कुलभूषण जाधव यांना एका बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरवून मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली होती. कुलभूषण जाधव यांना या शिक्षेविरोधात […]