India has suffered a lot due to Covid says Donald Trump

आम्ही चांगले काम करतो हे दाखवण्याची भारतीयांची सवय, पण कोरोनामुळे भारत उद्धवस्त झालाय – डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विषाणूच्या संसर्गावरून पुन्हा एकदा चीनवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की कोरोनाच्या संसर्गामुळे जगात भारतासह बरेच देश उद्धवस्त झाले आहेत. तसेच कोरोना विषाणू चीनची निर्मिती असल्याचं म्हणत चीनने अमेरिकेला नुकसानभरपाई म्हणून १० ट्रिलियन अमेरिकन डॉलर देण्याची मागणी देखील ट्रम्प यांनी केली. तसेच झालेले नुकसान यापेक्षा खूप […]

अधिक वाचा
Pfizer withdraws application for emergency use of its COVID-19 vaccine in India

मोठी बातमी : फायझरने 12 वर्षाखालील मुलांवर सुरू केल्या कोरोना लसीच्या ट्रायल

अमेरिका : अमेरिकेची कोरोना लस उत्पादक कंपनी फायझरने 12 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांवर लसीची चाचणी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात काही निरोगी मुलांना कोरोना लस दिली जाईल. चाचणीसाठी फायझरने जगातील चार देशांतील 4,500 हून अधिक मुलांना निवडले आहे. या चार प्रमुख देशांमध्ये अमेरिका, फिनलँड, पोलंड आणि स्पेनचा समावेश आहे. फायझरने याबाबत माहिती देताना सांगितले की, […]

अधिक वाचा
immediate lockdown needs in india for a few weeks over break the coronavirus chain says dr anthony s fauci

भारतात संपूर्ण लॉकडाऊन हाच पर्याय, भारताला मदत करण्यात विश्व कमी पडलं – अमेरिकेचे साथरोग तज्ज्ञ डॉ. फौसी

नवी दिल्ली : भारतासारख्या देशात कोरोना साखळी तोडण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन हाच पर्याय असल्याचं मत अमेरिकेतील साथरोग तज्ज्ञ डॉ. अँथनी एस फौसी यांनी व्यक्त केलं आहे. भारतात काही आठवड्यांसाठी संपूर्ण लॉकडाऊन लावलं तर परिस्थिती सुधारू शकते, असं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन सरकारमध्ये डॉ. अँथनी फौसी मुख्य आरोग्य सल्लागार म्हणून जबाबदारी हाताळत आहेत. देशात तात्काळ […]

अधिक वाचा
President Joe Biden lost his footing while climbing up the steps to Air Force One

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांचा विमानात चढताना तीन वेळा तोल गेला, व्हिडिओ होतोय व्हायरल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन शुक्रवारी एअरफोर्स वन या विमानात चढताना पायऱ्यांवरून तीन वेळा घसरले. त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. एअरफोर्स वनमध्ये चढताना बायडन पायऱ्यांवरून घसरले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अटलांटा येथे या आठवड्याच्या सुरुवातीला सामूहिक गोळीबार झाला. याबाबत आशिया-अमेरिकन समुदायाच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी बायडन यांना या विमानातून अटलांटा येथे जायचं […]

अधिक वाचा
130 cars collided in a massive accident in america

भयंकर : अमेरिकेत भीषण अपघात, 130 गाड्या एकमेकांना धडकल्या

अमेरिकेतील टेक्सासमधील फोर्ट वर्थमध्ये अतिशय भीषण अपघात झाला आहे. येथे महामार्गावर 130 वाहने एकमेकांना धडकली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या बर्फाळ टेक्सास आंतरराज्यीय महामार्गावर 130 हून अधिक वाहने एकमेकांना धडकली असून या अपघातात सहा जण ठार तर अनेकजण जखमी झाले आहेत. सध्या थंडी असून अमेरिकेच्या काही भागात वादळासह पाऊस आणि बर्फ पडत […]

अधिक वाचा
President Biden has canceled the controversial decision of Donald Trump

राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी रद्द केला डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ वादग्रस्त निर्णय

अमेरिकेचे ४६वे अध्यक्ष म्हणून जो बायडेन ज्युनियर आणि अमेरिकेच्या ४९व्या उपाध्यक्ष म्हणून कमला हॅरिस यांनी बुधवारी शपथ घेतली. या शपथविधीनंतर काही तासांमध्येच बायडेन यांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक महत्वपूर्ण निर्णय रद्द केला. बायडेन यांनी पॅरिस हवामानबदलविषयक करारामध्ये अमेरिका पुन्हा सहभागी होणार असल्याची घोषणा केली. वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी बुधवारी अमेरिकेला पॅरिस हवामानबदलविषयक करारामध्ये […]

अधिक वाचा
Donald Trump

…तरच मी व्हाईट हाऊस सोडायला तयार आहे- डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाउस सोडण्यासाठी एक अट ठेवली आहे. जर इलेक्टोरल कॉलेजकडून जो बायडन यांना अधिकृतपणे विजेता म्हणून घोषित करण्यात आलं तर मी व्हाईट हाऊस सोडायला तयार आहे, असं विधान ट्रम्प यांनी केलं आहे. निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरूवारी पहिल्यांदाच प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले कि, इलेक्टोरल कॉलेजनी जो […]

अधिक वाचा
Donald Trump finally conceded defeat

डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर मान्य केला पराभव, सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु

अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या जो बायडन यांची अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा पराभव अमान्य करुन पद सोडण्यास नकार दिला होता. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तीन आठवडे झाले तरी ट्रम्प आपल्या निश्चयावर ठाम होते. निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचं सांगून त्याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. आता मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता […]

अधिक वाचा
spokesperson for the United States Department of State Morgan Ortagus

एकटी अमेरिका जागतिक आव्हानांना सामोरे जाऊ शकत नाही, भारताची साथ महत्वाची – मॉर्गन ऑर्टागस

अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार विभागाच्या प्रवक्ता मॉर्गन ऑर्टागस यांनी म्हटले आहे की, एकटी अमेरिका जागतिक आव्हानांना सामोरे जाऊ शकत नाही. त्यासाठी भारताची साथ खूप महत्वाची आहे. दोघेही संयुक्तपणे मजबूत आणि सुरक्षित राष्ट्र आहेत. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी दोन्ही देश एकत्रितपणे कार्य करीत आहेत. ऑर्टागस म्हणाल्या की, अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाले आहेत. […]

अधिक वाचा