IPL डबल हेडर : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 17 व्या हंगामातील पहिला डबल हेडर आज खेळवला जाणार आहे. दिवसाच्या पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी मोहाली येथे दुपारी 3.30 वाजता होणार आहे. या सामन्याचा नाणेफेक महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दुपारी ३.०० वाजता होणार आहे.
पंजाब किंग्जचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी मोहालीतील नवीन स्टेडियम महाराजा यादवेंद्र सिंग स्टेडियममध्ये खेळवला जाईल. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच येथे हा सामना खेळवला जाणार आहे. रिषभ पंत 30 डिसेंबर 2022 रोजी कार अपघातात जखमी झाल्यापासून आयपीएलमध्ये टीम इंडिया किंवा दिल्लीकडून खेळू शकला नव्हता. या सामन्याद्वारे ऋषभ पंत स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल.
दुसऱ्या सामन्यात दोन वेळचा चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सचा सामना 2016 च्या चॅम्पियन सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. हा सामना संध्याकाळी ७.३० वाजता कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियम येथे होणार आहे.
ऋषभ पंतचे पुनरागमन
ऋषभ पंतचा कार अपघात झाला होता. त्यानंतर ऋषभ पंत आयपीएलच्या माध्यमातून क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक चाहत्याची नजर त्याच्या कामगिरीवर असेल. आयपीएलपाठोपाठ यंदा टी-२० विश्वचषकही आहे. पंतने आयपीएलमध्ये यष्टिरक्षण आणि फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली तर त्याचा विश्वचषकात समावेश केला जाऊ शकतो, असे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी म्हटले आहे.