स्वातंत्रदिनानिमित्त भारताच्या क्रिकेटपटूंनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.भारताचा स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून भारताच्या क्रिकेटपटूंनी देशवासियांसमोर आपले मत व्यक्त केले आहे.
विराट कोहलीने एक ट्विट करत शहीद जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत. तो म्हणाला की, “देशवासियांना स्वातंत्रदिनाचा शुभेच्छा. आपले जे जवान देशाला सुरक्षित ठेवत आहेत, जे सीमेवर आहेत त्यांनी स्वत:ला सुरक्षित ठेवायला हवे.”
इरफानने स्वातंत्रदिनी देशवासियांना शुभेच्छा देण्यासाठी ट्विट केले. या ट्विटमध्ये इरफान पठाण म्हणाला की, “मैने ख्वाब में सोने की चिडीया को परवा चढते हुए देखा हैं, चिडीया ने दाने कहीं रंग के खाए हो, लेकीन उसके जिस्मपे रंग सिर्फ तिरंगाही दिखता हैं” हे इरफानचे ट्विट सध्या चांगलेच व्हायरल झाले असून देशवासियांनी इरफानचे कौतुकही केले आहे.
युवराज सिंगने ट्विट करत म्हटले की, आम्ही स्वातंत्र्य मिळवू शकू यासाठी हजारो लोकांनी आपले जीवन शहीद केले, त्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळू शकले. चला त्या बलिदानाचा सन्मान करणारे आणि आपल्या देशाचा गौरव घडविणारे नागरिक होऊया. २०२० हे सर्वांसाठी कठीण वर्ष ठरले आहे, परंतु भारताच्या धैर्याने, आम्ही एकजुट होऊ.




