राजकारणात मला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून खुप काही शिकायला मिळालं -नितीन गडकरी

राजकारण

राज्यात भाजप भविष्यात शिवसेनेसोबत युती करणार का?

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

या प्रश्नावर बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं की, राजकारणात कोण कुणासोबत जातं त्यावरुन मी माझी निष्ठा बदलणार नाही. राजकारणात मला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून खुप काही शिकायला मिळायला.. त्यामुळे शिवसेनेने कुणाशी युती केली, कुणासोबत युती नाही केली, याच्याशी आमचा काही संबंध नाही. बाळासाहेबांचं स्थान कालही, आजही आणि उद्याही हृदयात राहील. उद्धव ठाकरे यांच्यासोबतही मी काम केलं आहे. माझे राज्यातील विविध पक्षातील अनेक नेत्यांची चांगले संबंध आहे. मी राजकारण आणि वैयक्तिक संबंध वेगळे ठेवतो. उद्धव ठाकरेंसोबत माझं नेहमी बोलणं होतं. मात्र राज्यातील राजकारणात आणि पक्षात माझी सध्या काही भूमिका नाही. मी सध्या दिल्लीत काम करतो आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काय होतं, याबाबत राज्यातील नेते निर्णय घेतात. राज्यातील राजकीय निर्णयांवर राज्यातील निर्णय देऊ शकतील, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात ते बोलत होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत