शैक्षणिक

शिक्षक भरतीबाबत प्रयत्न सुरु – वर्षा गायकवाड

शिक्षक भरतीबाबत प्रयत्न सुरु आहेत, असं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. राज्यात आणि देशात 31 ऑगस्टपर्यंत शाळा सुरु होणार नाहीत, हे स्पष्ट आहे. मात्र सप्टेंबरमध्ये कोरोनाची परिस्थितीत सुधार होईल आणि जनजीवन सुरळीत होईल आणि शाळाही सुरु होतील अशी अपेक्षा वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली. तसेच शाळा सुरु झाल्यानंतर सर्वोतपरी काळजी घेणेही मोठी जबाबदारी असणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अनेक मुलं आता ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. मुलांपर्यंत पुस्तके पोहोचवण्याचं काम शिक्षकांनी केलं. शिक्षक केवळ शिकवण्याचं नाही तर शिक्षणासाठी मदतीचंही काम करत आहेत. लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमही आम्ही कमी केला, जेणेकरुन विद्यार्थ्यांवर कोणतंही दडपण येऊ नये, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं. गावपातळीवर असलेल्या जिल्हा परिषद शाळांना स्मार्ट शाळा करावं लागणार आहे. मुलांच्या अंतर्गत मुल्यांना वाव देणारी शिक्षण व्यवस्था केली दिलं गेलं पाहिजे, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

गेल्या सरकारपासून प्रलंबित असलेल्या शिक्षण भरतीवरही त्यांनी आपलं मत मांडलं. शिक्षक भरतीबाबत प्रयत्न सुरु आहेत. राज्यात शिक्षण भरतीची आवश्यकता आहे. त्याबाबत काम सुरु आहे. काही निर्णय मंत्रिमंडळामार्फत घेतले जातात, मात्र सरकार म्हणून याबाबत सकारात्मक आहोत. विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. शिक्षक सेवकांच्या बाबतीत वित्त विभागाशी चर्चा सुरु आहे, असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत