cybagekhushboo Scholarship Program 2022-23

महत्वाचे! सायबेजख़ुशबु शिष्यवृत्ती कार्यक्रम 2022-23, ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार फायदा

पुणे महाराष्ट्र शैक्षणिक

पुणे : सायबेजख़ुशबु शिष्यवृत्ती कार्यक्रम 2022-२३ नुकतीच जाहीर झाली आहे.  पुणे जिल्ह्यातील रहिवासी व कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न ४ लाखांपेक्षा कमी असलेले तसेच १० वी आणि १२ वी मध्ये अथवा डिप्लोमाला किमान ६०% गुण असलेले विधार्थी अर्ज करू शकतात.  डिप्लोमा, अभियांत्रिकी, होमियोपॅथी, MBBS, आयुर्वेद, नर्सिंग, MSW, BCA, MCA, हॉटेल व्यवस्थापन आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रम. प्रथम वर्षाला आणि डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाला प्रवेश घेणारेच विद्यार्थी या शिष्यवृत्ती योजनेला अर्ज करू शकतात.  ११ वी, १२ वी BA, Bcom, plan Bsc व परदेशातील शिक्षण यासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार नाही.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

शिष्यवृत्ती कोणासाठी?
ज्या अर्जदार विद्यार्थी / विद्यार्थीनी चे पालक पुणे जिल्ह्यात राहतात ते अर्ज करू शकतात.
कोणत्या अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती :
डिप्लोमा, अभियांत्रिकी, होमियोपॅथी, MBBS, आयुर्वेद, नर्सिंग, MSW, BCA, MCA, हॉटेल व्यवस्थापन आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रम. प्रथम वर्षाला आणि डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाला प्रवेश घेणारेच विद्यार्थी या शिष्यवृत्ती योजनेला अर्ज करू शकतात. सेकंड इयर व पुढील वर्षांना शिकत असणाऱ्यांनी कृपया अर्ज व फोन करू नये.

पात्रता निकष :

  1. १० वी आणि १२ वी मध्ये अथवा डिप्लोमाला किमान ६०% गुण हवेत.
  2. कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न ४ लाखांपेक्षा कमी हवे.

ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना : 

  1. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी लिंकवरील Download Guide टॅब क्लिक करून गाईड पूर्ण वाचावे.
  2. शैक्षणिक माहिती पूर्ण व व्यवस्थितपणे नमूद करावे, जसे की इयत्ता १०, ११, १२, डिप्लोमा, पदवी इत्यादी.
  3. कुटुंबाच्या मासिक उत्पन्नाची माहीती अचूक व व्यवस्थितपणे नमूद करावी.
  4. कुटुंबातील सर्व सदस्यांची (आई, वडील, भाऊ, बहीण, आजी, आजोबा व इतर) माहिती अचूक भरावी.
  5. अपूर्ण अर्ज कोणत्याही सुचनेशिवाय रद्द करण्यात येतील.

जे वरील निकषांमध्ये बसतात अश्यांनी खालील लिंक वर ऑनलाईन फॉर्म भरणे बंधनकारक आहे.

http://www.cybagekhushboo.org/login

लिंक उपलब्ध : ९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर, २०२२ पर्यंत ११ वी, १२ वी BA, Bcom, plan Bsc व परदेशातील शिक्षण यासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार नाही अश्या विद्यार्थ्यांनी फोन करून चौकशी करू नये.

संपर्क :
अधिक माहितीसाठी सोमवार ते शुक्रवार, सकाळी १० ते संध्याकाळी ६ च्या दरम्यान संपर्क करू शकता.
राकेश :- ७४४७४२४६३१ / अमोल :- ७०३८५३६९४८

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत