उत्तराखंड : उत्तराखंडमधील द्रौपदीच्या दांडा-2 पर्वताच्या शिखराजवळ हिमस्खलन झाल्याची माहिती आहे. ज्यामध्ये नेहरू पर्वतारोहण संस्थेचे ४० गिर्यारोहक बेपत्ता झाले आहेत. यापैकी 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. 7 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर 8 जणांना वाचवण्यात यश आले आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी गिर्यारोहकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे हवाई दलाची मदत मागितली आहे. IAF ने बचाव आणि मदत कार्यासाठी 2 चित्ता हेलिकॉप्टर तैनात केले आहेत, इतर कोणत्याही गरजांसाठी हेलिकॉप्टरचा इतर सर्व ताफा स्टँडबायवर ठेवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगच्या प्रगत प्रशिक्षण अभ्यासक्रमादरम्यान दांडा येथे हिमस्खलनामुळे दोन प्रशिक्षकांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही प्रशिक्षक उत्तरकाशी येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. बचाव पथक इतर प्रशिक्षणार्थींना वाचवण्यात व्यस्त आहे. उत्तरकाशीच्या द्रौपदी का दांडा भागात 40 जणांचे पथक प्रगत प्रशिक्षणासाठी गेले होते. हे ठिकाण 5,006 मीटर उंचीवर आहे.
संरक्षण मंत्र्यांनी प्रशिक्षकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला:
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हिमस्खलनात दोन प्रशिक्षकांच्या मृत्यूबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करून शोकसंतप्त कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केल्या. याशिवाय त्यांनी मुख्यमंत्री धामी यांच्याशीही बोलून घटनेची माहिती घेतली. त्यांनी हवाई दलाला बचाव आणि मदत कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Deeply anguished by the loss of precious lives due to landslide which has struck the mountaineering expedition carried out by the Nehru Mountaineering Institute in Uttarkashi. My condolences to the bereaved families who have lost their loved ones. 1/2
— Rajnath Singh (@rajnathsingh) October 4, 2022




