Latur Udgir Accident Involving St Bus And Car Near Lohara Five Killed One Injured
महाराष्ट्र

लातूर : बस आणि कारचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार

लातूर : लातूर जिल्ह्यातील उदगीर जवळ बस आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला, तर बस चालकाच्या बाजूचा बसचा भाग कापला केला. या अपघातात अलोक तानाजी खेडकर (रा. संत कबीर नगर, उदगीर), अमोल जीवनराव देवक्तते (रावनकोळा), कोमल व्यंकट कोदरे (रा. डोरणाळी, ता मुखेड), यशोमती जयवंत देशमुख (यवतमाळ) आणि नागेश ज्ञानेश्वर गुंडेवार (रा. बिदर रोड, उदगीर) यांचा मृत्यू झाला. तर, प्रियांका गजानन बनसोडे (रा. एरोळ ह. मु. गोपाळ नगर, उदगीर) या जखमी झाल्या आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आज सकाळी उदगीर आगाराची एसटी बस उदगीरहून चाकूरकडे जात होती तर स्विफ्ट कार तुळजापूरहून दर्शन घेऊन उदगीरकडे येत होती. दरम्यान, लोहाऱ्याजवळ बस आणि कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी उदगीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन व शहर पोलीस ठाण्याचे तसेच उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दाखल झाले. जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. घटनास्थळाचा पंचनामा करून सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत