मुंबई : कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट झाल्याने आता सर्वांसाठी लोकलप्रवास केव्हा सुरू होणार, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. रेल्वे प्रशासनाकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले आहे की राज्य सरकारने सूचना केल्यानंतर तातडीने सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा सुरु करण्यात येईल. रेल्वे प्रशासन पूर्ण क्षमतेने लोकल फेऱ्या सुरू करण्यासाठी सज्ज असून, केवळ राज्य सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं कि, “ट्रेन आम्ही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु ठेवल्या आहे आणि त्याचा परिणाम दिसत आहे. काही वेळ तरी यावर निर्बंध ठेवावे लागतील. सरसकट सूट दिली तर गर्दी होईल. त्यामुळे पुढील १५ दिवस तरी लोकल सर्व प्रवाशांसाठी खुली करता येणार नाही.
पश्चिम रेल्वेवर सध्या ९५ टक्के लोकल फेऱ्या सुरू आहेत. रेल्वे मोटारमन, गार्ड, तिकीट तपासणीस, क्लार्क अशी सर्व यंत्रणा राबतच आहे. राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याबाबत सूचना दिल्यानंतर लोकलबंदी मागे घेतली जाईल. आम्ही पूर्ण क्षमतेने लोकल फेऱ्या चालवण्यास सज्ज आहोत, असे पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘Mumbai local trains might not open for all for another 15 days’ https://t.co/xLBQ7d5BQn via @mumbaimirror
— m-Indicator – Mumbai Local (@m_indicator) May 25, 2021




