Koli Bandhav and Warakari on Krishnakunj to present their problems
पुणे महाराष्ट्र राजकारण

राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेची तारीख, ठिकाण आणि वेळ ठरली…

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेची तारीख ठरली आहे. राज यांची २१ तारखेची सभा आता २२ मे रोजी (रविवारी) होणार आहे. पुण्याच्या स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा रंगमंच इथे सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास राज ठाकरे यांची जाहीर सभा होईल, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

राज ठाकरे येत्या ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. अयोध्या दौऱ्याआधी राज ठाकरे पुण्यात जाहीर सभा घेणार आहेत. पहिल्यांदा २१ मे रोजी राज ठाकरे यांच्या सभेचं नदीपात्रात आयोजन करण्यात आलं होतं, पण पावसाची शक्यता लक्षात घेता सभेचं नियोजन बदलून आता ती सभा रविवारी २२ मे रोजी गणेश कला क्रीडा रंगमंच इथे होणार आहे.

आज मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांची पुण्याच्या जाहीर सभेबाबत चर्चा झाली. राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्याआधी खूप विषयांवर बोलायचे आहे. म्हणूनच या सभेचं आयोजन केलेलं आहे. २१ तारखेची नदीपात्रातील सभा, त्यात पावसाचा धोका लक्षात घेऊन ती सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज ठाकरे यांची परवानगी घेऊन मनसे पदाधिकाऱ्यांनी सभेची तारीख आणि ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतल्याचं बाळा नांदगावकर म्हणाले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत