राजकारण

पश्चिम बंगालचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सोमेन मित्रा यांचे निधन

पश्चिम बंगालचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सोमेन मित्रा यांचे काल रात्री १:३० वाजता निधन झाले.कोलकातामधील एका खासगी रुग्णालयात त्यांचे उपचार सुरू होते. त्यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.सोमेन मित्रा यांच्या निधनाची माहिती त्यांच्या परिवारातील सदस्याने दिली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सोमेन मित्रा यांना अनेक आजारांनी ग्रासले होते. रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी किडनीच्या त्रासामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.अचानक हृदय बंद पडल्याने त्यांचे निधन झाले.

पश्चिम बंगाल काँग्रेसने ट्विटरवरून त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.ते काँग्रेसचे दिग्गज नेते आणि लोकसभेचे सदस्य होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत