the act of raping a woman

महिलेवर बलात्कार करून त्या कृत्याचा व्हिडीओ केला व्हायरल, आरोपी फरार

देश

अल्पवयीन मुलाने विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमधील कानपूर मध्ये ही घटना घडली. आरोपीने या कृत्याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

“विवाहित महिलेवर बलात्कार केल्यानंतर अल्पवयीन मुलाने त्या कृत्याचा व्हिडीओ बनवला व सोशल मीडियावर अपलोड केला” असे सादर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. बलात्काराची ही घटना पाच महिन्यांपूर्वी घडली. पण महिला त्यावेळी याबद्दल काहीही बोलली नाही. पण आता हा व्हायरल व्हिडीओ पीडित महिलेच्या सासू-सासऱ्यांनी बघितला आणि त्यानंतर तिला घराबाहेर काढले. पीडित महिलेला घराबाहेर काढण्यात आल्यानंतर तिने पोलिसांची मदत मागितली.

पीडित महिला आता तिच्या आई-वडिलांसोबत राहते. सादर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवताना या महिलेने तिच्यासोबत काय घडलं, याबाबतची सर्व माहिती दिली आहे. आम्ही या प्रकरणी तपास करत आहोत. आरोपी फरार आहे. त्याला लवकरच अटक करु असे सादर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत