सहारनपूर – दिल्ली ट्रेनला आग : मेरठच्या दौराला येथे शनिवारी सकाळी सहारनपूरहून दिल्लीला जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनला आग लागली, यावेळी मोठी दुर्घटना टळली आणि लोक वेळेत ट्रेनमधून खाली उतरले. ट्रेनमधून लागलेल्या आगीमुळे लोक घाबरले होते. पॅसेंजर ट्रेनच्या दोन डब्यांना आणि इंजिनला आग लागल्यानंतर उर्वरित डबे वेगळे करण्यात आले. यादरम्यान प्रवाशांनी संपूर्ण ट्रेन धक्का देऊन दूर ढकलली आणि आगीच्या भक्ष्यस्थानी येण्यापासून वाचवली.
सहारनपूरहून दिल्लीला जाणारी पॅसेंजर ट्रेन शनिवारी सकाळी दौराला रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचली, मात्र दौराला रेल्वे स्थानकावर पोहोचण्यापूर्वीच 2 डबे आणि इंजिनला आग लागली, त्यानंतर ट्रेन दौराला स्थानकावर थांबवण्यात आली. यावेळी सर्व प्रवासी ट्रेनमधून सुखरूप खाली उतरले. यादरम्यान प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवत रेल्वे कर्मचाऱ्यांसह रेल्वेचे इतर डबे आग लागलेल्या डब्यापासून वेगळे करून पुढे ढकलले, त्यामुळे रेल्वेचे इतर डबे आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून बचावले.
Ekta Mein Bal: After two coaches and engine of Saharanpur-Meerut passenger train caught fire, the rest of the bogies were separated. Passengers pushed the entire train away to save it from catching fire. pic.twitter.com/NG6RIXg3iO
— Lokmanchtoday (@lokmanchtoday) March 5, 2022




