IAS officer who vacated Delhi stadium to walk his dog transferred to Ladakh

स्टेडियममध्ये कुत्र्याला फिरवणे IAS दाम्पत्याला पडले महागात, केंद्रीय गृहमंत्रालयाने केली ‘ही’ कारवाई…

देश

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील त्यागराज स्टेडियममध्ये कुत्र्याला फिरवणे आयएएस अधिकारी आणि त्यांची आयएएस पत्नी दोघांनाही महागात पडले आहे. स्टेडियममध्ये कुत्र्याला फिरवण्याची बातमी व्हायरल झाल्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्रालयाने दोन्ही अधिकाऱ्यांची बदली केली आहे. त्यागराज स्टेडियममधील सुविधांचा गैरवापर केल्याप्रकरणी संजीव खिरवार आणि त्यांची पत्नी रिंकू दुग्गा यांना दिल्लीहून लडाख आणि अरुणाचल प्रदेशात हलवण्यात आले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आयएएस अधिकारी आणि त्यांच्या पत्नीवर आरोप आहे की, ते त्यांच्या कुत्र्यासोबत फिरण्यासाठी त्यागराज स्टेडियममध्ये यायचे, त्यामुळे खेळाडू आणि प्रशिक्षकांना सराव करताना त्रास व्हायचा. सरावातील व्यत्ययामुळे त्रासलेल्या काही खेळाडूंनी आपली बदली जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर  करवून घेतली आहे.

खेळाडूंना वेळेपूर्वीच स्टेडियम सोडावे लागायचे

खेळाडूंना संध्याकाळी 7 वाजताच स्टेडियम सोडण्यास सांगितले जायचे, जेणेकरुन आयएएस अधिकाऱ्याला फिरण्यात कोणतीही अडचण येऊ नये आणि अधिकारी त्यांच्या कुत्र्यासह तेथे फिरू शकतील. परंतु, त्यामुळे खेळाडूंच्या नियमित प्रशिक्षणावर वाईट परिणाम होत आहे. संजीव खिरवार हे 1994 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यागराज स्टेडियम 2010 च्या राष्ट्रकुल खेळांसाठी बांधण्यात आले होते. यामध्ये राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडू व फुटबॉलपटू सराव करतात.

गृह मंत्रालयाने मुख्य सचिवांकडून अहवाल मागवला होता
या प्रकरणाची दखल घेत गृह मंत्रालयाने दिल्लीच्या मुख्य सचिवांकडून या प्रकरणाचा अहवाल मागवला होता. मुख्य सचिवांनी आपला अहवाल मंत्रालयाला सादर केला, त्यानंतर सरकारने आयएएस दाम्पत्यावर कारवाई केली आहे. भारत सरकारचे अंडर सेक्रेटरी राकेश कुमार सिंह यांनी आयएएस जोडप्याला तत्काळ प्रभावाने बदली झालेल्या राज्यांमध्ये जॉईन होण्याचे आदेश दिले आहेत.

आता क्रीडा केंद्रे रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शहरातील सर्व सरकारी क्रीडा केंद्रे रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी गुरुवारी ही माहिती दिली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत