supreme court
देश

गुजरात दंगल प्रकरणी नरेंद्र मोदींना SIT क्लीन चिट कायम, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली झाकिया जाफरी यांची याचिका

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने 2002 च्या गुजरात दंगलीप्रकरणी विशेष तपास पथकाची (SIT) पीएम मोदींची क्लीन चिट कायम ठेवली. झाकिया जाफरी यांच्या वतीने नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट देणाऱ्या एसआयटीच्या अहवालाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

न्यायमूर्ती एएम खानविलकर, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. झाकिया जाफरी यांच्या याचिकेवर मॅरेथॉन सुनावणी पूर्ण केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सात महिन्यांपूर्वी ९ डिसेंबर २०२१ रोजी निर्णय राखून ठेवला होता. गुजरात दंगलीच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट दिली होती, जे गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री होते.

झाकिया जाफरी यांनी दिले होते आव्हान 
झाकिया जाफरी यांच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली आहे. 2002 च्या गुजरात दंगलीत गुलबर्ग सोसायटी हत्याकांडात तत्कालीन काँग्रेस आमदार एहसान जाफरी यांची दंगलखोर जमावाने हत्या केली होती. झाकिया जाफरी या त्यांच्या पत्नी आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून एसआयटीच्या अहवालाला आव्हान दिले होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत